30 C
Mumbai
Saturday, September 3, 2022
घरमहाराष्ट्रLove Jihad : अल्पवयीन मुलगी झाली 'लव्ह जिहाद'ची शिकार

Love Jihad : अल्पवयीन मुलगी झाली ‘लव्ह जिहाद’ची शिकार

'लव जिहाद' या संकल्पनेचा वापर करून हिंदू मुलींची फसवणूक करण्यासारखे प्रकार अत्यंत गंभीर आहेत, परंतु वेळीच मुलीने मदतीसाठी आरडाओरडा केला नसता तर ती सुद्धा लव जिहादची शिकार झाली असती अशा प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून येत आहेत. 

अहमदनगर जिल्ह्यात लव्ह जिहादचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलीने भाऊ समजून सलमान शेख नावाच्या मुस्लिम मुलाला राखी बांधली, परंतु याचा गैरफायदा घेत सलमानने त्या मुलीला जबरदस्ती एका ठिकाणी घेऊन जात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यावेळी त्या मुलीने आरडा – ओरडा सुरू केला त्यामुळे तिथे स्थानिक जमा झाले आणि ही भयंकर घटना उघडकीस आली. या घटनेने अहमदनगर शहरातील पालक वर्गात प्रचंड खळबळ उडाली असून याबाबत आरोपी सलमान शेख याला पोलिसांनी तातडीने अटक केली आहे. दरम्यान आरोपीने इतर कोणासोबत सुद्धा असे प्रकार केले आहेत का याची सुद्धा पोलिसांकडून तपासणी करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर येथे शहर परिसरात राहणाऱ्या एका 17 वर्षीय मुलीच्या भोळेपणाचा गैरफायदा घेत तिच्याशी एका तरुणाने अश्लिल कृत्य करण्याचा प्रयत्न केला. सदर घटना रक्षाबंधनाच्या दिवशी घडली असून एका अल्पवयीन हिंदू मुलीने एका सलमान शेख नावाच्या व्यक्तीला राखी बांधली. सलमानने सुद्धा भाऊ असल्याचे भासवून त्या मुलीचा विश्वास संपादन केला. त्या मुलीने सुद्धा सहजपणे त्याच्यावर विश्वास ठेवला.

दरम्यान, 26 ऑगस्ट रोजी दुपारी सदर पीडित मुलगी कॉलेजला जात असताना सलमान शेखने तिला रस्त्यात अडवले. आणि तिच्यासोबत त्याने जोरजबरदस्ती करण्यास सुरूवात केली. त्या मुलीने या संपुर्ण गोष्टीला विरोध दर्शवला परंतु सलमान शेख याने सोबत येण्यास सांगितले त्यावर न ऐकल्यास जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. त्यानंतर सलमान पीडित मुलीला अहमदनगर सिद्धिबाग परिसरात घेऊन आला आणि तिच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करण्यास सुरूवात केली.

हे सुद्धा वाचा…

Abdul Sattar : अबब ! मंत्री अब्दुल सत्तार यांच्या शिक्षण संस्थेत 12 शिक्षक बोगस

गणेश चतुर्थी व्रत : गणेशोत्सवाचा उत्साह पोहोचला शिगेला

CM Eknath Shinde : मेट्रो चाचणीच्या निमित्ताने एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंवर साधला बाण

सलमानच्या या विचित्र वागण्याने पीडिता घाबरून गेली, तिने जोरजोरात आरडाओरडा करण्यास सुरूवात केली. तिच्या रडण्याचा आवाज ऐकताच तेथील स्थानिक नागरिकांनी लगेचच गर्दी केली आणि तात्काळ पोलिसांना बोलावून घेतले. या संपुर्ण प्रकरणानंतर पोलिसांनी दोघांना सुद्धा पोलिस स्टेशनमध्ये नेले. त्यानंतर पीडित मुलीला या संपुर्ण प्रकरणाबाबत विचारपूस करून त्यावर तिचा जबाब नोंदवला. यावेळी तिच्या घरच्यांना सुद्धा बोलावून घेत पोलिसांनी याबाबत सदर घटनेची माहिती दिली.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत अहमदनगर कोतवाली पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून या प्रकरणी आणखी तपास करण्यात येत आहे. ‘लव जिहाद’ या संकल्पनेचा वापर करून हिंदू मुलींची फसवणूक करण्यासारखे प्रकार अत्यंत गंभीर आहेत, परंतु वेळीच मुलीने मदतीसाठी आरडाओरडा केला नसता तर ती सुद्धा लव जिहादची शिकार झाली असती अशा प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून येत आहेत.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी