आकाश दडस, बिदाल : माण तालुका कायम दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र येथील शेतकरी अशा प्रतिकुल वातावरणात देखील शेतीत अनेक प्रयोग करत असतात. अलिकडे माण तालुक्यातील शेतकऱ्यांनी अनेक य़शस्वी प्रयोग शेतीत केल्याची उदाहरणे पहायला मिळतात. डाळींब, सफरचंदाच्या बागा, फुले, भाजीपाला उत्पादन देखील शेतकरी घेत आहेत. बाजरी हे माण तालुक्यातील पारंपरिक पिक समजले जाते. मात्र कमी पावसावर भरघोस उत्पादनासाठी एका शेतकऱ्याने तुर्कीतून बाजरीचे बियाणाची लागवड केली असून या पिकाला तीन फुटांपर्यत कणसे लागली आहेत.
यंदा माणतालुक्यात म्हणावा तसा पाऊस पडला नाही. शेतकऱ्यांना निसर्गानेही साथ दिली नाही. पाऊस कमी झाल्याने तुर्कस्तानातील बाजरी लावण्याचा माण तालुक्यातील पळशी येथील शेतकरी बबन ढोले यांचा प्रयोग यशस्वी झाला. पेरणी केलेल्या बाजरीचे पीक साधारण १२ फुटांपर्यंत वाढले आहे. तसेच कणसाची लांबी साडेतीन ते चार फूट आहे. प्रत्येक कणीस दाणेदार असून बबन ढोले यांनी प्रती एकर सव्वा किलो बियाणे पेरले होते. त्यांना प्रति एकर ४० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळण्याची शक्यता आहे.
हे सुद्धा वाचा
गिरीष महाजन पुन्हा सरकारसाठी ठरले संकटमोचक; धनगर समाजाचे आंदोलन मागे
शिक्षक भरतीच्या मागणीसाठी तरुणाने मंत्रालयात सुरक्षा जाळीवर घेतली उडी
पवारसाहेबांनी पंकजा मुंडेंना मदतीची भूमिका घेतली होती, पण भाजपने त्यांना डावलले : सुप्रिया सुळे
अतिशय कमी पाण्यामध्ये हे बाजरीचे पीक येत असल्याचा त्यांचं म्हणणं आहे. साधारणपणे या बाजरीच्या एका झाडाला तब्बल अडीच ते तीन फुटाचे बाजरीची कणीस येतात.आपल्या कायमच्या बाजरी पिकापेक्षा या तुर्की बाजरीचे भरघोस उत्पन्न मिळते.त्यामुळे शेतकऱ्यांना या तुर्की बाजरी पासून नक्कीच फायदा मिळू शकतो असा विश्वास प्रयोगशील शेतकरी बबन ढोले यांनी सांगितले.