28 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रMahadev Jankar : धनगर समाजातील मुलांना राज्य सरकारकडून मिळणार 'या' सवलती

Mahadev Jankar : धनगर समाजातील मुलांना राज्य सरकारकडून मिळणार ‘या’ सवलती

उच्च शिक्षणासाठी मुलांच्या वस्तीगृहासाठी मी मंत्री असलेल्या पशुसंवर्धन विभागाच्या जागा प्रत्येक विभागात देण्यात आल्या. प्रत्येक विभाग, त्यानंतर जिल्हा व तालुका स्तरावर वस्तीगृह असावेत अशी सुद्धा समाजाची मागणी होती, त्यानुसार सरकारने बारा योजनांचा शासन आदेश काढला. त्यामुळे या योजनांचा सगळ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहनच महादेव जानकर यांनी केले आहे.

राज्यभरात आरक्षणाच्या नावाने राजकारण सुरू असताना राज्य सरकारने धनगर समाजाच्या मुलांच्या प्रलंबित सवलतींना मान्यता देऊन समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा तात्पुरता बाजूला सारला आहे. दरम्यान, या समाजाच्या मुलांच्या शिक्षणासाठी विभागनिहाय वसतीगृहासह अदिवासी विभागाच्या धर्तीवर तब्बल 12 योजनांना मंजुरी दिल्याचा आदेश राज्य सरकारने काढला असल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी दिली आहे. सध्या इतर आरक्षणाप्रमाणे धनगर समाजातीसाठी एसटीचे आरक्षण मिळण्याचा विषय सुद्धा महत्त्वाचा आहे, परंतु याबाबतच्या निर्णयाला उशीर होत असल्याने राज्य सरकारने विद्यार्थ्यांबाबतच्या इतर मागण्यांकडे लक्ष केंद्रीत करण्याचे ठरवले असून त्यांच्या महत्त्वाच्या योजनांना त्यांनी तात्काळ मंजूरी दिली आहे.

याबाबत माहिती देताना राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर म्हणाले, धनगर समाजाला एसटीचे आरक्षण मिळावे ही समाजाची मुख्य मागणी आहे, मात्र या मागणीला काही कारणाने उशीर होत असल्याने आम्ही समाजाची प्रगती होण्यासाठी एसटीच्या सवलती लागू करण्याची मागणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. या मागणीसाठी भाजप सरकारमध्ये मंत्री असताना धनगर समाजातील मुलांच्या शिक्षणासह आदिवाशी समाजाप्रमाणे सोई – सुविधा मिळाव्यात म्हणून योजनाचा प्रस्ताव मी सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन तयार केला होता, मात्र राज्यात सत्तांतर होऊन महाआघाडीचे सरकार आले आणि त्यांनी या प्रस्तावाचा शासन आदेश काढला नाही, असे म्हणून त्यांनी खंत व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा…

Haribhau Rathod : हरिभाऊ राठोडांनी बदलली पार्टी, थेट ‘आम आदमी पार्टी’त प्रवेश

Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटीमुळे 1,135 कोटींचे नुकसान

Nilesh Rane : निलेश राणे म्हणाले, हात जोडून माफी मागतो

जानकर पुढे म्हणाले, राज्यात नव्याने शिंदे फडणवीस सरकार आल्याने त्यांच्याकडे योजनाच्या अंमलबजावणीची पुन्हा मागणी केली. त्यांनी तात्काळ आदेश देत शासन निर्णय काढल्याने त्यांचे आभार असे म्हणून महादेव जाणकर यांनी नव्या सरकारचे आभार मानले आहेत. उच्च शिक्षणासाठी मुलांच्या वस्तीगृहासाठी मी मंत्री असलेल्या पशुसंवर्धन विभागाच्या जागा प्रत्येक विभागात देण्यात आल्या. प्रत्येक विभाग, त्यानंतर जिल्हा व तालुका स्तरावर वस्तीगृह असावेत अशी सुद्धा समाजाची मागणी होती आणि त्यानुसार सरकारने बारा योजनांचा शासन आदेश काढला त्यामुळे या योजनांचा सगळ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहनच महादेव जानकर यांनी केले आहे.

कोणत्या 12 योजनांना मिळाली मान्यता?

1) भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नवी मुंबई, नाशिक, औरंगाबाद, पुणे, नागपूर , अमरावती या महसूली विभागांच्या ठिकाणी वस्तीगृह निर्माण करणे.

2) वसतीगृहापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाच्या धर्तीवर स्वयंम योजनेच्या धर्तीवर स्वतंत्र योजना कार्यान्वीत करणे.

3) गुणवंत विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश देणे.

4) धनगर समाजाच्या बेघर कुटुंबियांना 10,000 घरकुले बांधून देणे.

5) समाजासाठी आवश्यक असलेल्या परंतु अर्थसंकल्पीत निधी उपलब्ध नसलेल्या कार्यक्रम / योजना राबविण्यासाठी न्युक्लियस बजेट योजना राबविणे .

6) समाजातील युवक युवतींना लष्करातील सैनिक भरती व राज्यातील पोलीस भरतीसाठी आवश्यक ते मुलभूत प्रशिक्षण देणे.

7) केंद्र शासनाच्या स्टैंड अप इंडिया योजनेतर तर भटक्या जमाती क या प्रवर्गातील नवउद्योजकांन सहाय्य करण्यासाठी मार्जिन मनी उपलब्ध करून देणे.

8) होतकरू बेरोजगार पदवीधर युवक-युवतींना स्पर्धा परिक्षेसाठी परीक्षा /निवासी प्रशिक्षण देणे.

9) समाजातील बेरोजगार युवक-युवतींना स्पर्धा परिक्षासाठी परिक्षा शुल्क आर्थिक सवलती लागू करणे .

10) 75 टक्के अनुदानावर 4 आठवडे वयाच्या सुधारीत देशी प्रजातीच्या 100 कुकुट पक्षांच्या खरेदी व संगोपनासाठी अर्थसहाय्य देणे.

11)धनगर समाजातील भूमीहीन मेंढपाळ कुटुंबांसाठी अर्धबंदिस्त आणि बंदिस्त मेंढी पालनासाठी जागा उपलब्ध करुन देणे किंवा जागा खरेदीसाठी अनुदान तथा अर्थ सहाय्य देणे.

12) मेंढपाळ कुटुंबाना पावसाळयात चराई करण्याकरीता जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या कालावधीसाठी अनुदान देणे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी