लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुकांची विधानसभा निवडणुकीत पुनरावृत्ती टाळावी, अशी सूचना गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची 2024 ची घोषणा अद्याप झाली नाही. मात्र, आतापासून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीचा प्रचार आणि तिकीटासाठी सर्वच राजकीय पक्षांनी डावपेच सुरू केले आहेत. भारतीय जनता पक्षाने आता पासूनच आपली तयारी सुरु केली आहे. यातच आता गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.(Maharashtra Assembly Election 2024 Amit Shah gave advice to CM Shinde, Devendra Fadnavis)
शिंदे सरकारची मळलेली प्रतिमा घेवून निवडणूक कशी लढवायची ? शाहांसमोर प्रश्न
गणपति बाप्पा मोरया🙏
दशकों से मेरे जैसे असंख्य श्रद्धालुओं की आस्था का केंद्र मुंबई के प्रसिद्ध ‘लाल बाग के राजा’ का आज दर्शन-पूजन कर आशीर्वाद लिया।
विघ्नहर्ता श्री गणपति बाप्पा सभी का कल्याण करें। pic.twitter.com/zdEV5V25B4
— Amit Shah (@AmitShah) September 9, 2024
माहितीनुसार, अमित शहा रात्री उशिरा मुंबईत पोहोचले आणि त्यांनी भाजप कोअर कमिटीची बैठकही घेतली. याचवेळी, अमित शहा यांनी महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर येऊ नये, जाहीर वाद टाळावेत,अशी सूचना केल्या. अमित शहा हे दोन दिवस मुंबई दौऱ्यावर आहे. अमित शहा यांनी रविवारी आपल्या कुटुंबासह लालबागच्या राजाचं दर्शन घेतले. यांनतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर महत्वाच्या बाबींवर चर्चा केली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुकांची विधानसभा निवडणुकीत पुनरावृत्ती टाळावी, असा सल्लाही अमित शहांनी दिला. तसेच, एकजूट होऊन विधानसभा निवडणूक लढवण्याची सूचना दिली. (Maharashtra Assembly Election 2024 Amit Shah gave advice to CM Shinde, Devendra Fadnavis)
हर्षवर्धन पाटील तुतारी हातात घेणार का ? ऐका त्यांच्यात तोंडून
#WATCH | Union Home Minister Amit Shah arrives at the residence of Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis in Mumbai, to offer prayers to Lord Ganesh. pic.twitter.com/htm1QTcBLo
— ANI (@ANI) September 9, 2024
अमित शहा यांनी राज्यातील सद्यस्थिती आणि आगामी विधानसभा निवडणूक 2024 च्या तयारीबाबत दोन तास चर्चा झाली. या बैठकीत भाजपने 150 जागांवर निवडणूक लढवण्याचा आणि किमान 125 जागांवर निवडणूक जिंकण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीला अजून दोन महिने बाकी असताना अमित शहा मुंबईत आल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. (Maharashtra Assembly Election 2024 Amit Shah gave advice to CM Shinde, Devendra Fadnavis)
#WATCH | Union Home Minister Amit Shah and his wife Sonal Shah have the darshan of Lord Ganesh and offer prayers to him at Lalbaugcha Raja in Mumbai. pic.twitter.com/ZM5ENm3aFv
— ANI (@ANI) September 9, 2024
राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती आणि ‘लाडकी बहिन योजने’चे श्रेय घेण्यासाठी महायुतीमध्ये चढाओढ सुरू आहे. त्याचवेळी गृहमंत्र्यांनी बदलापूरमधील अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण प्रकरण आणि शिवाजी महाराजांचा पुतळा पाडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागितलेली माफी याबाबतच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. यावेळी भाजप नेत्यांनी तयार केलेले नियोजनही अमित शहा यांनी समजून घेतले. महायुतीमध्ये कोणत्याही परिस्थितीत मतभेद असले तरी युती अखंड ठेऊन निवडणुकीला सामोरे जाण्याच्या सूचनाही अमित शहा यांनी दिल्या. (Maharashtra Assembly Election 2024 Amit Shah gave advice to CM Shinde, Devendra Fadnavis)
या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, मंत्री गिरीश महाजन, मंत्री रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार पंकजा मुंडे आदी उपस्थित होते.