31 C
Mumbai
Wednesday, March 27, 2024
Homeमहाराष्ट्रआप्पा धर्माधिकारी "महाराष्ट्र भीषण" कार्यक्रमात उष्माघात नव्हे चेंगराचेंगरीचे बळी; प्रथमच प्रत्यक्षदर्शीने सांगितली...

आप्पा धर्माधिकारी “महाराष्ट्र भीषण” कार्यक्रमात उष्माघात नव्हे चेंगराचेंगरीचे बळी; प्रथमच प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबिती

शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मोठा गाजावाजा करत आप्पा धर्माधिकारी यांना प्रदान केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे या सोहळ्याला उपस्थित होते. मात्र जेवढा गाजावाजा केला तेवढी श्री सदस्यांची काळजी घ्यायला मात्र सरकार विसरले आणि भोंगळ नियोजनामुळे उष्माघाताने 14 श्री सदस्यांचा बळी गेला.

या दुर्घटनेमध्ये वसईतील 58 वर्षीय मीनाक्षी मिस्त्री यांचा देखील बळी मृत्यू झाला. त्यांची 52 वर्षीय मैत्रीण किरण कामतेकर यांनी त्या दिवशीच्या दुर्घनटेचा भयंकर घटनाक्रम सांगितला. किरण कामतेकर म्हणाल्या, त्यादिवशी कार्यक्रमस्थळी झालेल्या धक्काबुक्की आणि चेंगराचेंगरीमुळे आम्हा दोघींची ताटातूट झाली, माझ्यादेखत त्या दुसऱ्या दिशेला गेल्या. आणि दुसऱ्या दिवशी मीनाक्षीताईंचा मृत्यू झाल्याचे वृत्त समजले.

पुरस्कार वितरण सोहळ्याचा घटनाक्रम सांगताना किरण कामतेकर म्हणाल्या, त्या दिवशी दुपारी दीड वाजता आम्ही कार्यक्रम स्थळावरुन बाहेर पडलो. मैदानापासून दूर अंतरावर उभ्या केलेल्या बसेसच्या दिशेने मोठ्या संख्येने श्री सदस्य निघाले होते. आम्ही देखील काही मीटर चाललो, त्याचवेळी गर्दी होऊन रेटारेटी झाली, त्या गोंधळात मीनाक्षीताईंचा हात माझ्या हातून सुटला. आम्ही एकमेकींना हाका मारत होतो. पण चेंगराचेंगरी वाढतच होती, त्या चेंगराचेंगरीमध्ये तब्बल 20 मीनिटे मी अडकले, आपण या गर्दीतून जिवंत बाहेर पडू याची देखील मला खात्री राहिली नव्हती.

किरण कामतेकर पुढे म्हणाल्या, चेंगराचेंगरीमध्ये माझा श्वास कोंडला. मला काहीच सुचत नव्हते, त्याही परिस्थिती मला एक माणूस आपल्या बायकोला गर्दीतून बाहेर काढत असल्याचे दिसले आणि मी त्या महिलेची साडी पकडली आणि कशीबशी गर्दीतून बाहेर आले. त्यानंतर मी मीनाक्षीताईंना फोन करुन त्यांच्याशी संपर्क होतोय का पाहत होते. पण त्यांचा फोन लागला नाही. अनेकजण त्या ठिकाणी बेशुद्ध पडल्याचे मला दिसले. अनेकांचा आरडाओरडा सुरु होता. तो प्रसंग आठवला तरी माझ्या अंगावर काटा उभा राहतो. त्यानंतर मला एक एक बस मिळाली, खारघर स्टेशनला मोठी गर्दी असल्याने बसने आम्हाला जुईनगरला सोडले.

कामतेकर म्हणाल्या, मी धर्माधिकारींचे अनेक कार्यक्रम पाहिले आहेत, कार्यक्रमाचे अतिशय नेटके नियोजन केले जाते. परंतू त्या दिवशी मी मृत्यूच्या दाढेतून सुटून आले. त्यानंतर मी संध्याकाळी साडेसात वाजता वसईला पोहचले, घडलेला प्रसंग मुलांना सांगितल्यावर त्यांना देखील मोठा धक्का बसला. मीनाक्षीतांईंना वारंवार फोन करुन देखील त्यांच्याशी कसलाच संपर्क होत नव्हता, त्यामुळे काळजात काहूर उठले होते.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी (सोमवारी) संध्याकाळी सहा वाजताच्या दरम्यान मला मालाडच्या बहिणीचा फोन आला. तीने फोनवर मला विचारले आणि सोशल मीडियावरचा फोटो मिनीक्षीताईंचाच आहे का ? अशी विचारपूस केली. त्यानंतर मी सोशल मीडियावर फोटो पाहिला आणि माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. त्या आता जगात नाहीत यावर मला विश्वासच बसत नव्हता. मीनाक्षीताईंची बॅग एका व्यक्तीला सापडली होती. त्याने त्यांचा फोन चार्जिंग करुन मला फोन केला. त्यानंतर मी मीनाक्षीतांईंच्या घरी गेले. मात्र त्याआधीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले होते. मला त्यांचे अंत्यदर्शन देखील घेता आले नाही अशी खंत किरण कामतेकर यांनी व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा

बारसू रिफायनरी प्रकरण: आंदोलन चिघळलं! पोलिसांची कोकणवासियांना अमानुष मारहाण; पाहा व्हिडिओ

IRCTC: तिकीट वेटिंगवर, चिंता नको; चालत्या ट्रेनमध्ये Online सीट मिळवण्याची सोपी पद्धत जाणून घ्या 

एकनाथ शिंदे यांना जोर का झटका ; शिवसेना भवन आणि संपत्तीवर हक्क सांगणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली..!    

मीनाक्षी मिस्त्री यांच्या धाकट्या भावाची रविवारी दुसरी पुण्यतिथी होती. 16 एप्रिल 2021 रोजी करोना संसर्गामुळे त्यांचे निधन झाले होते. त्याच दिवशी मिनाक्षी मिस्त्री यांचा देखील मृत्यू झाला, हा निव्वळ योगायोग आहे. तर योगायोग म्हणजे माझ्या आई आणि मामा या दोघांवरही त्यांच्या निधनाच्या दुसऱ्या दिवशी 17 एप्रिल या तारखेलाच अंत्यसंस्कार झाले, असं मीनाक्षी मिस्त्रींचा मोठा मुलगा विवेकने सांगितले.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी