30 C
Mumbai
Thursday, May 18, 2023
घरमहाराष्ट्रMaharashtra Budget 2023 : 'नागरिकांच्या आरोग्याची सरकारला काळजी?' वाचा आरोग्यासाठी काय आहेत...

Maharashtra Budget 2023 : ‘नागरिकांच्या आरोग्याची सरकारला काळजी?’ वाचा आरोग्यासाठी काय आहेत तरतुदी…

यंदाच्या अर्थसंकल्परात सरकारकडून राज्यातील नागरिकांच्या आरोग्याच्या आणि ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रश्नांवर उपाय म्हणून कोणकोणत्या नविन योजना आणि तरतूदी करण्यात आल्या आहेत याची संक्षिप्त माहिती या बातमीमार्फत जाणून घेऊ...

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी 2023-24 या वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात सरकारने अनेक तरतूदी समाविष्ठ केल्या आहेत. यंदाच्या अर्थसंकल्परात सरकारकडून राज्यातील नागरिकांच्या आरोग्याच्या आणि ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रश्नांवर उपाय म्हणून कोणकोणत्या नविन योजना आणि तरतूदी करण्यात आल्या आहेत याची संक्षिप्त माहिती या बातमीमार्फत जाणून घेऊ…

महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत, आता 5 लाखांपर्यंत उपचार करता येणार
– महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत विमा संरक्षण योजनेअंतर्गत यापूर्वी  1.50 लाखांपर्यंत उपचार घेण्याची तरतूद होती. या योजनेतील रक्कम वाढवत यंदाच्या अर्थसंकल्पात एकुण 5 लाख रुपयांपर्यंत उपचार घेता येणार आहे.

नवीन 200 रुग्णालयांचा यात समावेश करणार
-महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेतील लाभारथ्यांना काही ठराविक रुग्णालयांमध्येच लाभ मिळतो. यापूर्वी रुग्णालयांची संख्या फार कनमी असल्याच्या तक्रारी अनेकदा समोर आल्या आहेत. ही बाब लक्षात घेत आता रुग्णालयांच्या यादीत 200 नव्या रुग्णालयांची भर पडली आहे.

हे सुद्धा वाचा

Maharashtra Budget 2023: जलसंधारणासाठी शिंदे-फडणवीस सरकारच्या योजना वाचा एका क्लिकवर

यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी ‘या’ विशेष तरतुदी

महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023 : ‘या’ आहेत महत्त्वाच्या ठळक बाबी

मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचे लाभ 2.50 लाखांहून 4 लाखांपर्यंत-
-मुत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी यापूर्वी लाभार्थ्यांना 2.50 लाखांचा लाभ मिळत होता. या रकमेत वाढ करून हा आकडा यंदाच्या अर्थसंकल्पात 4 लाखांवर नेऊन ठेवला आहे.

राज्यभरात 700 स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना
-राज्यभरात प्रत्येक शहरात मिळून विविध ठिकाणी एकुण 700 स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या नावाअंतर्गत सरकारी दवाखान्यांची उभारणी करणार असल्याची अभिनव घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत अनेक छोट्या-मोठ्या आजारांवर नागरिकांना माफक दरात उपचार मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी