29 C
Mumbai
Saturday, September 3, 2022
घरमहाराष्ट्रMaharashtra Cabinet : एकनाथ शिंदेच्या मंत्रीमंडळात महिलेचा नवा चेहरा

Maharashtra Cabinet : एकनाथ शिंदेच्या मंत्रीमंडळात महिलेचा नवा चेहरा

मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला स्थान मिळणार याबाबत काही नावे समोर आली आहेत. त्यानुसार राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, गिरीष महाजन, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, रविंद्र चव्हाण यांचा उद्या शपथविधी पार पडणार आहे. पुण्यातील भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांची सुद्धा वर्णी लागणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

राज्यात सत्तासंघर्षानंतर मंत्रीमंडळ विस्ताराच्या मुद्यावरून नवा वाद सुरू झाला. शिंदे – फडणवीस सरकार येऊन महिन्यापेक्षा अधिक काळ उलटून गेला तरीही मंत्रीमंडळ विस्ताराच्या केवळ पोकळ बाता होत राहिल्या त्यामुळे विरोधी गटातून तीव्र प्रतिसाद येऊ लागला, यावरून सामान्य जनतेत सुद्धा रोष वाढू लागला. दरम्यान हा असंतोष आणखी वाढायच्या आत शिंदे – फडणवीस सरकारने मंत्रीमंडळ विस्ताराचा नवा मुहूर्त शोधत या चर्चांना आता विराम दिला आहे. या नव्या मंत्रिमंडळात चंद्रकांत पाटील, गिरीष महाजन, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, रविंद्र चव्हाण आणि माधुरी मिसाळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. आणखी कोणाकोणाची मंत्रीपदी वर्णी लागणार हे पाहणे या निमित्ताने महत्त्वाचे ठरणार आहे.

मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली असून  उद्या 11 वाजता मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. मंत्रिमंडळात 35 – 65 चा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. राजभवनात या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार असून यासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. विधीमंडळ परिसरात सुद्धा पोलिसांचा प्रचंड ताफा तैनात करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

Eknath Shinde Cabinet Expansion : दरेकर, पंकजाताई, राम शिंदे, पडळकर, सदाभाऊ यांना मंत्रीमंडळात स्थान नाही

Maharashtra Cabinet : दोन पाटलांना मंत्रीपदाचे आवतणं

Eknath Shinde cabinet Expansion : पहिल्या दिवशी मंत्रीपदाची झूल, दुसऱ्या दिवशी अधिवेशनाच्या औताला झुंपणार !

दरम्यान मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला स्थान मिळणार याबाबत काही नावे समोर आली आहेत. त्यानुसार राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, गिरीष महाजन, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, रविंद्र चव्हाण यांचा उद्या शपथविधी पार पडणार आहे. यावेळी नितेश राणे यांना सुद्धा मंत्रीपद मिळणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे तसेच पुण्यातील भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांना सुद्धा मंत्रीपद मिळणार अशा चर्चा सध्या रंगल्या आहेत.

पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वर्ष आमदारपद भूषवलेल्या माधुरी मिसाळ यांना मंत्रिपद मिळाले तर शिंदे – फडणवीस सरकारमधील त्या पहिल्या महिला चेहरा ठरतील. मिसाळ यांना पक्षश्रेष्ठींकडून फोन आल्याने त्यांची या मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी