महाराष्ट्राच्या राजकारणाकडे सध्या सर्वांचे लक्ष वेधून आहे, दोन आठवड्या आधीच महायुती सरकारचा शपथविधी झाली. मात्र, अजून देखील मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत होते. मात्र, आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त समोर आला आहे. होय, उद्या म्हणजे शनिवारला सकाळी 11 वाजता किंवा सायंकाळी चार वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. (Maharashtra Cabinet swearing ceremony held on saturday)
विश्वविजेता गुकेशची कामगिरी ऐतिहासिक: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपचे 21 , शिवसेना शिंदे गटाचे 12 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 10 मंत्री उद्या शपथ घेणार आहेत. आता मुहूर्त तर मिळाला. यांनतर आता राजभवनात शपथविधीच्या तयारीला सुरुवात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, यादरम्यान, एकनाथ शिंदेंच्या नाराजीमुळे मंत्रिमंडळाचा विस्तार पुढे जाईल, अशी चर्चा होती. परंतु आता येत्या शनिवारी हा शपथविधी होणार असल्याची माहिती मिळत आहे. (Maharashtra Cabinet swearing ceremony held on saturday)
दिल्लीतील संमेलन स्थळाला छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी नाव
नागपुरातील हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं. मंत्रीपदासाठी निवडलेल्या नावांवर दिल्लीत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. (Maharashtra Cabinet swearing ceremony held on saturday)
शिवसेनेचे 12 मंत्री शपथ घेऊ शकतात.तर त्यातील 9 कॅबिनेट तर 3 राज्यमंत्री असणार आहेत. अब्दुल सत्तार, तानाजी सावंत आणि संजय राठोड यांच्या नावाला भाजपचा विरोध आहे. त्यामुळे या तिघांचा पत्ता कट्ट होण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून उदय सामंत, शंभूराजे देसाई, गुलाबराव पाटील, दादा भुसे, प्रताप सरनाईक, संजय शिरसाठ, भरत गोगावले, आशिष जयस्वाल तर राज्यमंत्रीपदासाठी योगेश कदम आणि विजय शिवतारे हे राज्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकतात. याशिवाय प्रकाश आबिटकर किंवा राजेंद्र पाटील यड्रावकर यापैकी एकाच्या मंत्रीपदाची शक्यताही व्यक्त केली जात आहे. (Maharashtra Cabinet swearing ceremony held on saturday)
अजित पवार गटाला 10 मंत्रिपदे देण्यात येणार आहेत. त्यात 8 कॅबिनेट तर 2 राज्यमंत्रिपदे असणार आहेत. मंत्रिमंडळाच्या विस्ताराआधी माजी मंत्री हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवारांची देवगिरी निवासस्थानी भेट घेतली. तर याअगोदर माजी मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनीही अजित पवारांची भेट घेतली होती. त्याचवेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील उपस्थिती असल्याची माहिती आहे. (Maharashtra Cabinet swearing ceremony held on saturday)
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता संजय उपाध्याय यांनी सांगितले की, मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर नागपुरात मंत्र्यांसाठी 40 बंगले सज्ज करुन ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्र्यांसाठी निवासाची व्यवस्था पूर्ण झाली आहे. रवीभवन परिसरात कॅबीनेट मंत्र्यांसाठी 24 बंगले सज्ज आहेत, तर नागभवन परिसरात राज्य मंत्र्यांसाठी 16 बंगले सज्ज करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असं संजय उपाध्याय यांनी सांगितले. (Maharashtra Cabinet swearing ceremony held on saturday)