29 C
Mumbai
Saturday, September 3, 2022
घरमहाराष्ट्रBreaking : हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा!

Breaking : हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा!

मुंबई शहरासाठी 8, 9 आणि 10 ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट दर्शवण्यात आला आहे. सध्या मुंबईसह कोकणात सुद्धा मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधारमुळे अनेक ठिकाणी तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे, पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस आता पुन्हा बरसू लागला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांची तारांबळ उडाली आहे. याबाबत हवामान खात्याकडून सुद्धा महत्त्वाची माहिती समोर आली असून 7 ते 11 ऑगस्टच्या दरम्यान कोकणासह मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशाराच हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने त्याचे वादळात रुपांतर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्रात 8 ते 10 ऑगस्ट पर्यंत ऑरेज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे बाहेर पडताना आता  प्रत्येकाने काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

राज्यात अनेक ठिकाणी सध्या जोरदार पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे सुद्धा चित्र दिसून येत आहे. अशातच  7 ते 11 ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टी होणार असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने अतिवृष्टीचा अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र पुढच्या 48 तासात आणखी तीव्र होणार असून त्याचे डिप्रेशनमध्ये रुपांतर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

Azadi ka Amrit Mahotsav : भाजपच्या दृष्टीने देशाला २०१४ मध्ये स्वातंत्र्य मिळाले, मग अमृतमहोत्सवाची इव्हेन्टबाजी कशाला?

Shrikant Deshmukh : महिलेच्या फसवणूक प्रकरणी श्रीकांत देशमुखांना न्यायालयाचा तुर्तास दिलासा

Eknath Shinde: मंत्रीमंडळ विस्तारावर मजेशीर कविता !

दरम्यान, मुंबई शहरासाठी 8, 9 आणि 10 ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट दर्शवण्यात आला आहे. सध्या मुंबईसह कोकणात सुद्धा मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधारमुळे अनेक ठिकाणी तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे, पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी