30 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeमहाराष्ट्रMaharashtra Politics : महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष पुन्हा लांबणीवर; न्यायालयाने सांगितली पुढील सुनावणीची तारीख

Maharashtra Politics : महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष पुन्हा लांबणीवर; न्यायालयाने सांगितली पुढील सुनावणीची तारीख

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर मंगळवार (1 नोव्हेंबर) रोजी सुनावणी करण्यात आली. यावेळी या संघर्षावरील पुढील सुनावणी 26 नोव्हेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आली होती.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर मंगळवार (1 नोव्हेंबर) रोजी सुनावणी करण्यात आली. यावेळी या संघर्षावरील पुढील सुनावणी 26 नोव्हेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. या विषयावर मंगळवारी कोणताही निर्णय देण्यात आलेला नाही त्यामुळे तुर्तास सध्या महाराष्ट्रात सत्तेत असणाऱ्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला काही काळासाठी दिलासा मिळाला असल्याचे पाहायला मिळत आहे.

27 सप्टेंबर 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने निवडणूक आयोगाला शिवसेना पक्षाबाबत निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. या निर्णयानंतर निवडणूक आयोगाकडून शिवसेना हे नाव आणि पक्षाचे अधिकृत चिन्ह धनुष्यबाण गोठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नाव आणि मशाल हे चिन्ह देण्यात आले. तर, दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना नावाखाली ढाल-तलवार हे चिन्ह देण्यात आले होते.

हे सुद्धा वाचा

CM OSD : मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकारी यांना नक्षलवाद्यांकडून मिळाली धमकी

Beauty Sleep : निवांत झोपेमुळे आता तुमची सुंदरता वाढणार! जाणून घ्या काय आहे ‘ब्युटी स्लीप’

UPI Payment Charges : आता ऑनलाईन पेमेंटवरही अधिकचे पैसे द्यावे लागणार? वाचा सविस्तर

सध्या महाराष्ट्रात मुंबई पुण्यासह अनेक महापालिकांच्या निवडणूका प्रलंबित आहेत. त्यामुळे या महापालिका निवडणूकांच्या आधीच सर्वोच्च न्यायालयाने निकाल जाहीर करावा अशी मागणी उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आली असून, आपण अद्याप शिवसेना सोडलेली नाही त्यामुळे आमचा गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करत शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण या चिन्हावर एकनाथ शिंदे गटाकडून दावा करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणात आता सर्वोच्च न्यायालयातील पुढील सुनावणी 26 नोव्हंबर रोजी होणार आहे. त्यामुळे दोन्ही गटांकडे आपले दावे सिद्ध करण्यासाठी 25 दिवसांची ओसंत असल्याचे दिसून येत आहे. आता दोन्ही गटांपैकी कोणाला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळेल आणि तो किती लवकर मिळेल हे पाहावे लागणार आहे. शिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या निकाल महापालिका निवडणूकींच्या आधी लागणीर की उशीराने याबाबत देखील मोठा संभ्रम असल्याचे पाहायला मिळत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी