27 C
Mumbai
Sunday, March 19, 2023
घरमहाराष्ट्रराज्यातील पाणी योजनांना आता इलेक्ट्रोक्लोरिनेशनची साथ

राज्यातील पाणी योजनांना आता इलेक्ट्रोक्लोरिनेशनची साथ

राज्यात २० हजार ७०५ गावातील पाणीपुरवठा योजनांना ही यंत्रणा बसवल्यानंतर गावांना स्वच्छ पाणीपुरवठा मिळण्यास मदत होणार आहे.

जलजीवन मिशनच्या सातारा जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यान्वित करण्यात येणाऱ्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांसाठी इलेक्ट्रोक्लोरीनेशन (Electro chlorination) यंत्रणा उभारण्यात येणार आहे. त्यानुसार राज्यात 20 हजार 705 तर सातारा जिल्ह्यातील 875 गावातील पाणीपुरवठा योजनांना यंत्रणा बसवल्यानंतर गावांना स्वच्छ पाणीपुरवठा होण्यास मदत होणार आहे. (Maharashtra state water schemes to have electric chlorination system)

आज महाराष्ट्रात अजूनही महिलांना पाण्यासाठी दोन­तीन किलोमीटर पायपीट करावी लागते. एक फार अर्थपूर्ण वाक्य आहे, “जेव्हा एखादी स्त्री लांब जाऊन पाणी आणते, तेव्हा कमी पाण्याची नसते, तर कमी असते ती न्यायाची. याच अनुषंगाने शासनाचे जलजीवन मिशन अंतर्गत मार्च २०२४ पर्यंत प्रत्येक घरात नळ कनेक्शन देण्याचे नियोजन आहे. ज्या गावात टँकरने पाणीपुरवठा केला जात होता, त्या गावात नळपाणी पुरवठा योजना प्राधान्याने देण्यात आली आहे. त्यामुळे टँकरमुक्त गावे करण्याचा विडा प्रशासनाने उचलला आहे.

बदलत्या ऋतुमानाप्रमाणे, ठिकठिकाणी पाण्याची उपलब्धतासुद्धा कमी जास्त होते. शहरी व निमशहरी भागात जेथे मोठ्या टाक्यातून नळाने पाणी पुरवठा केला जातो. धरणे, कालवे, नदी, नाले याद्वारे पाणी पुरवठा उपलब्ध केला जातो. मात्र, पिण्यासाठी पुरवठा केले जाणारे पाणी पूर्णपणे सुरक्षित व पिण्यायोग्य करणे व ते शेवटपर्यंत राखण्यासाठी कायम यंत्रणा सतर्क ठेवावी लागते. योग्य प्रकारे निर्जंतुकीकरण न केल्यास, गॅस्ट्रो, कॉलरा कावीळ यासारख्या रोगांची साथ झपाट्याने पसरत असते. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने विविध उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

नागरिकांना स्वच्छ पाणी मिळण्यासाठी पाणी पुरवठा योजनांना इलेक्ट्रोक्लोरीनेशन यंत्रणा बसवण्यात येणार आहे. त्यासाठी गावच्या पाणीपुरवठा योजनेनुसार त्याला खर्च येणार आहे. खर्चाची तरतूद योजनेच्या अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. ही यंत्रणा काही गावात दाखल झाली असून यंत्रे बसवण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे. ही यंत्रे बसवण्यात आल्यानंतर नागरिकांना स्वच्छ पाणी मिळण्यास मदत होणार आहे.

इलेक्ट्रोक्लोरीनेशन हे पर्यावरणीय विष निर्माण न करता पिण्याच्या पाण्याचे क्लोरीनीकरण करते. इतर क्लोरीनेशन तंत्रांप्रमाणे, इलेक्ट्रोक्लोरीनेशन हायड्रोजन व्यतिरिक्त कोणताही गाळ तयार करत नाही. इलेक्ट्रोक्लोरीनेशन म्हणजे खाऱ्या पाण्यामधून विद्युत प्रवाह पार करून हायपोक्लोराइट तयार करण्याची प्रक्रिया. हे पाणी निर्जंतुक करते आणि ते मानवी वापरासाठी सुरक्षित करते, जसे की पिण्याचे पाणी किंवा स्विमिंग पूलचे पाणी. जेव्हा एक जलतरणपटू तलावामध्ये प्रवेश करतो तेव्हा त्या पाण्यात अब्ज जीव सोडतात. क्लोरीनेशनच्या वापरामुळे जलतरणपटूंसाठी हानीकारक असे सर्व जीव नष्ट होण्यास मदत होईल.

हे सुद्धा वाचा : दररोज नारळाचे पाणी पिल्याने दूर होतात अनेक आजार; वाचा सविस्तर

जावलीतील 14 गावांच्या नवीन नळ पाणीपुरवठा योजना द्या : शशिकांत शिंदे

दररोज नारळाचे पाणी पिल्याने दूर होतात अनेक आजार; वाचा सविस्तर

राज्यातील पुढील एकूण 20,705 गावांत इलेक्ट्रोक्लोरिनेशन यंत्रणा बसविण्याचे पाणीपुरवठा विभागाची योजना आहे.
जिल्हा आणि गावे

 • सातारा – 875
 • अहमदनगर – 469
 • अकोला – 239
 • अमरावती – 62
 • औरंगाबाद – 379
 • बीड – 109
 • भंडारा- 217
 • बुलढाणा – 688
 • चंद्रपूर – 1321
 • धुळे – 673
 • गडचिरोली – 302
 • गोंदिया – 450
 • हिंगोली – 578
 • जालना – 613
 • कोल्हापूर – 119
 • लातूर – 889
 • नागपूर – 1369
 • नांदेड – 1375
 • नंदुरबार – 944
 • नाशिक – 1562
 • उस्मानाबाद – 705
 • पालघर – 675
 • परभणी – 827
 • पुणे – 158
 • रायगड- 697
 • रत्नागिरी- 16
 • सांगली – 381
 • सिंधुदुर्ग – 3
 • सोलापूर – 423
 • ठाणे – 613
 • वर्धा – 67
 • वाशिम – 518
 • यवतमाळ – 1676

एकूण – 20,705

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी