26 C
Mumbai
Wednesday, September 27, 2023
घरमहाराष्ट्रमहात्‍मा गांधींचे खरे वडील मुस्लीम जमीनदार; संभाजी भिडे यांचे पुन्हा वादग्रस्त...

महात्‍मा गांधींचे खरे वडील मुस्लीम जमीनदार; संभाजी भिडे यांचे पुन्हा वादग्रस्त विधान

वादग्रस्त विधाने करण्यात सांगलीच्या संभाजी भिडे यांचा कोणीही हात धरू शकत नाही. कायम वादाला तोंड फोडणारे विधान  करून हे भिडे प्रसिद्धीझोत आपल्याकडे वळवत असतात. अमरावतीत एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ‘महात्‍मा गांधींचे खरे वडील मुस्लीम जमीनदार होते’ असे विधान केले. त्यामुळे राज्यसह देशातील कॉंग्रेस कार्यकर्ते चिडले आहेत.

महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते, पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्‍यांचे खरे वडील आहेत, असे वक्‍तव्‍य श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थान संस्‍थेचे संस्‍थापक मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी अमरावतीतील कार्यक्रमात केले आहे. बडनेरा मार्गावरील जय भारत मंगलम येथे गुरुवारी रात्री संभाजी भिडे यांच्‍या सभेचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी भिडे यांनी हे वक्तव्य केले आहे. भिडे म्‍हणाले, मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले, त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले असल्याचे सबळ पुरावे उपलब्ध असल्याचा दावाही यावेळी संभाजी भिडे यांनी केला.
हे सुद्धा वाचा
दिल्लीतील ‘आका’साठी अधिवेशनाला दोन दिवसांची सुट्टी दिली का ?- नाना पटोले

संभाजी भिडे यांनी यापूर्वी तुकाराम महाराज यांच्यासह अनेक मोठ्या लोकांवर टीकाटिप्पणी केली आहे. वृत्त वाहिनीच्या महिला प्रतिनिधीने कुंकू, टिकली लावली नसल्याने याच भिडे यांनी तिचा अपमान केला होता. शिवाय माझ्या आंब्याच्या झाडाचे आंबे खाल्ल्यास पुत्र प्राप्ती होईल असे अंधश्रद्धा पसरवणारे विधान केले होते. यासाठी सरकारने भिडे या व्यक्तीला नोटीस बजावली होती. पण या भिडे यांनी नोटिस आपल्याला काही मिळाली नाही, असा कांगावा केला. त्यानंतर भिडे हे पंतप्रधान मोदी यांच्या जवळचे असल्याने सरकार त्यांच्यावर कारवाई करत नाही, असे बोलले जाते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी