27 C
Mumbai
Monday, March 25, 2024
Homeमहाराष्ट्रसमृध्दी महामार्गावर उद्घाटनानंतर 24 तासातच भीषण अपघात, दोन कारची समोरासमोर टक्कर

समृध्दी महामार्गावर उद्घाटनानंतर 24 तासातच भीषण अपघात, दोन कारची समोरासमोर टक्कर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या समृध्दी द्रुतगती महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील नागपूर शिर्डी एक्सप्रेस वे वर भीषण अपघात झाला आहे. उद्घाटनानंतर 24 तासातच, दुसऱ्याच दिवशी या महामार्गावर दोन कारची समोरासमोर टक्कर झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या समृध्दी द्रुतगती महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील नागपूर शिर्डी एक्सप्रेस वे वर भीषण अपघात झाला आहे. उद्घाटनानंतर 24 तासातच, दुसऱ्याच दिवशी या महामार्गावर दोन कारची समोरासमोर टक्कर झाली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

विशेष म्हणजे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या ठिकाणी महामार्गाचे उद्घाटन केले, त्या ठिकाणाजवळच हा अपघात झाला आहे. समोरून येणाऱ्या एका कारने टोल बूथजवळ दुसऱ्या कारला धडक दिली. दोन्ही कार चालकांनी वाटाघाटी करून तोडगा काढला, त्यामुळे पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धीचा ‘एंट्री पॉइंट’ असलेल्या वाईफल टोल प्लाझाजवळ सोमवारी हा अपघात झाला. टोल बूथजवळ एक कार कमी वेगाने जात असताना नागपूरची एक कार भरधाव आली. कार चालकाने ब्रेक लावला, मात्र त्याचे नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या कारला धडक दिली.

हे सुद्धा वाचा

कोरोनानंतर प्रथमच घडला विक्रम; एका दिवसात तब्बल दीड लाख प्रवाशांचा मुंबई विमानतळावरुन प्रवास

मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस वे काम डिसेंबर अखेर पूर्ण होईल : नितीन गडकरी

G-20 च्या बैठकीमुळे मंबईतील रस्ते 16 डिसेंबर पर्यंत बंद; पाहा काय आहेत पर्यायी मार्ग

अपघातावेळी टोल नाक्यावर कर्मचारी उपस्थित होते. या सगळ्यांनी गाडीकडे धाव घेतली. अपघातात दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे. विशेषत: अपघातग्रस्त कारच्या पुढील उजव्या बाजूचा भाग तुटला होता. सुदैवाने दोन्ही कारमधील कोणीही जखमी झाले नाही. ही माहिती हिंगणा पोलीस ठाण्यात मिळाली. मात्र, तक्रार नसल्याने पोलीस परतले. स्टेशन डायरीत याची नोंद करण्यात आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी