30 C
Mumbai
Saturday, August 6, 2022
घरमहाराष्ट्र"माळशेज घाट एक रमणीय सृष्टी सौंदर्याचा खजीना"

“माळशेज घाट एक रमणीय सृष्टी सौंदर्याचा खजीना”

टीम लय भारी

मुंबईः ‘ऋतू हिरवा, ऋतू बरवा’ अनुभवायचा असेल तर मग एकदा तरी माळशेज घाटामध्ये पावसाळी सहलीला जावून या. या घाटात धबब्यांना पूर आलेला असतो. गाडीवर देखील धबधब्याचे फवारे उडत असतात. अजूबाजूला सृष्टीने हिरवा शालू पांघरलेला पाहण्याची मौज न्यारी असते. अनेक जण या ठिकाणी पावसाळी सहलीचा आनंद लुटतात. मात्र या घाटात पावसाळयात वाहने चालवणे खूप अवघड काम आहे. थोडसं जपून, थोडसं सावधपणे आपण इथला प्रवास करु शकतो. मात्र पावसाळयातली इथली हवा, इथलं सृष्टीचं गोजिरवाणं रुपडं, इथल्या मातीचा सुगंध, रानफुलांचा सुगंध सगळचं अवर्णनीय असतं. ते स्वतः अनुभवण्याशिवाय गत्यंतर नाही.

"माळशेज घाट एक रमणीय सृष्टी सौंदर्याचा खजीना"

वनस्पती आणि प्राणी यांच्यामुळे माळशेज घाट गिर्यारोहक ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींमध्ये लोकप्रिय आहे. मुंबई, पुणे आणि ठाणे येथून वीकेंडला जाण्यासाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे.माळशेज धबधबा, पिंपळगाव धरण आणि आजोबा हिलफोर्ट ही इथली काही आकर्षणे आहेत जी कोणत्याही पर्यटकाला मंत्रमुग्ध करतात.कल्याण-मुरबाड-नगर रस्त्यावर ठाण्यापासून ९० किमी अंतरावर माळशेज घाट आहे.

हे सुध्दा वाचा:

शिवसेनेला पुन्हा फटका; हजारो कार्यकर्त्यांनी धरली शिंदेगटाची वाट

देवेंद्र फडणवीसांचे माईक प्रेम आणि बरेच काही…

यशाचे श्रेय घेण्यात ‘अमित शाह’ हुशार

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!