25 C
Mumbai
Sunday, February 5, 2023
घरमहाराष्ट्रचंद्रकांत पाटलांनी बेळगावचे नाव बदलले!; मनीषा कायंदे यांचा संताप

चंद्रकांत पाटलांनी बेळगावचे नाव बदलले!; मनीषा कायंदे यांचा संताप

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी येत्या 3 डिसेंबर रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकिकरण समितीच्या कार्यकर्त्यांसोबत मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री शंभुराजे देसाई बेळगावंला जाणार असल्याचे ट्विट चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. मात्र या ट्वि्टमध्ये पाटील यांनी 'बेळगावं'चा उल्लेख 'बेळगावी' असा केल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आमदार तथा प्रवक्त्या प्रा. मनीषा कायंदे यांनी संताप व्यक्त करत चंद्रकांत पाटील यांना खडे बोल सुनावले आहेत.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी येत्या 3 डिसेंबर रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकिकरण समितीच्या कार्यकर्त्यांसोबत समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री शंभुराजे देसाई बेळगावंला जाणार असल्याचे ट्विट चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. मात्र या ट्वि्टमध्ये पाटील यांनी ‘बेळगावं’चा उल्लेख ‘बेळगावी’ असा केल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आमदार तथा प्रवक्त्या प्रा. मनीषा कायंदे यांनी संताप व्यक्त करत चंद्रकांत पाटील यांना खडे बोल सुनावले आहेत.

आमदार प्रा. मनीषा कायंदे यांनी ट्विटवरुन चंद्रकातं पाटील यांचा समाचार घेतला आहे. ”दादा, भाजपचे परप्रांतीय नेते नाराज होवू नयेत म्हणून तुम्ही बेळगावचे नाव ‘बेळगावी’ करून टाकले. लक्षात ठेवा ‘महाराष्ट्रा’पेक्षा भाजप मोठा नाही. समितीने तुम्हाला सीमा भागाचा प्रश्न सोडवायला बोलावले आहे. तिथे भाजप स्टाईल बोटचेपी भूमिका घेऊ नका.” असे ट्व्टिट आमदार कायंदे यांनी केले आहे.

मध्यवर्ती महाराष्ट्र एकिकरण समितीने बेळगाव एकिकण समितीचे समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील यांना चर्चेसाठी निमंत्रण धाडले होते. हे निमंत्रण चंद्रकांत पाटील यांनी स्विकारत बेळगावंला जाण्याचे निश्चित केले आहे. या संदर्भात पाटील यांनी ट्विट केले आहे, त्यात त्यांनी म्ह्टले आहे की, ”महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी बेळगावी येऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करावी, अशी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची भूमिका आहे. त्यानुसार मी आणि समन्वयक मंत्री शंभुराज देसाई ३ डिसेंबर रोजी दिवसभर बेळगाव येथे जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहोत. भेटूया, चर्चेतून नक्कीच मार्ग निघतो!”

चंद्रकात पाटील यांच्या या ट्विटवर आमदार मनीषा कायंदे यांनी संताप व्यक्त केला आहे. कर्नाटकमध्ये सध्या भाजपचे सरकार असून तेथील मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावे कर्नाटकमध्ये येण्यास उत्सुक असल्याचे म्हटले होते. तसेच सोलापूर जिल्ह्याबाबत देखील त्यांनी अशीच मुक्ताफळे उधळली होती. त्यानंतर महाराष्ट्रात कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात असंतोष उफाळला आहे.
हे सुद्धा वाचा :
राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष भाजपने पळवला !

आंदोलनाच्या पेटंटवर हक्क सांगणाऱ्या राज ठाकरेंनी कोश्यारींच्या विरोधात ‘खळ्ळ खट्याक करावे…’, प्रा. मनीषा कायंदे यांचे आव्हान

Sanjay Raut : शिवाजी महाराजांच्या अपमानानंतर राज्यात असंतोष; संजय राऊतांनी दिला ‘महाराष्ट्र बंद’ आंदोलनाचा इशारा

त्यातच चंद्रकांत पाटील यांनी ‘बेळगावं’चा उल्लेख ‘बेळगावी’ असा केल्याने आमदार मनीषा कायंदे यांनी चंद्रकात पाटलांवर निशाणा साधत म्हटले आहे की, परप्रांतीय नेते नाराज होऊ नयेत म्हणून बेळगावंचे ‘बेळगावी’ करुन टाकले. मात्र महाराष्ट्रापेक्षा भाजप मोठा नाही, त्यामुळे चर्चा करायला जाताना भाजपसारखी बोटचेपी भूमिका घेऊ नका, असा सनसनीत टोला आमदार कायंदे यांनी लगावला आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!