29 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरमहाराष्ट्रमराठ्यांच्या मराठवाड्यातील महाविराट सभेत काय घडणार?

मराठ्यांच्या मराठवाड्यातील महाविराट सभेत काय घडणार?

मराठा समाजाचा नवा आश्वासक चेहरा म्हणून मनोज जरांगे-पाटील उदयास आले आहेत. ज्या गावात त्यांनी बेमुदत उपोषण सुरु केले होते, ज्या गावात मराठा उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला त्याच अंतरवाली सराटी गावात जरांगे-पाटील यांची महाविराट सभा होत आहे, हे विशेष. या निमित्ताने मराठा समाजाने सभेसाठी जय्यत तयारी केली आहे. राज्यभरातून लाखोंच्या संख्येने मराठा समाज सभेसाठी येणार असल्याने त्यात कुठलीही कसर राहू नये, याची मराठा समाज सर्वतोपरी काळजी घेत आहे. तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पोलिसांनीही मोठा फौजफाटा तैनात केला आहे. शिवाय वाहतुकीच्या मार्गातही मोठे बदल केले आहेत. त्यामुळे आजचा दिवस मराठा समाजासाठी कदाचित निर्णयक ठरू शकतो.

मराठांच्या महाविराट सभेची वैशिष्ठ्ये

 1. ही सभा तब्बल 160 एकर जागेवर होणार आहे
 2. मैदानात प्रवेश करण्यासाठी 8 प्रवेशद्वार उभारण्यात आलेत
 3. मनोज जरांगे-पाटील यांच्या प्रवेशासाठी 600 फूट लांबीचा रॅम्पची उभारणी
 4. तब्बल 140 एकरवर पार्किंगची व्यवस्था
 5. मैदानाच्या चारही बाजूंना 6 लाख पाण्याची बाटल्यांची आणि 50 पाण्याच्या टँकरची सुविधा
 6. ज्या व्यासपीठावरून जरांगे भाषण करणार ते 10 फूट उंच आणि त्याचा आकार 20 बाय 36 फूट आहे
 7. सभेस्थळावर एकूण 10 ठिकाणी वैद्यकीय सुविधा उपलब्ध
 8. एकूण 400 डॉक्टर आणि 40 नर्स तत्पर
 9. सभा स्थळ परिसरात 75 अँब्युलन्स आणि 35 कार्डियाक अँब्युलन्स सज्ज
 10. जरांगे-पाटील यांचे भाषण ऐकता यावे यासाठी 20 एलईडीची सुविधा
 11. जरांगेंचे भाषण सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी एक हजार लाऊड स्पीकर
 12. सभेचे स्थळ आणि पार्किंगची सुविधा यात किमान दीड किलोमीटरचे अंतर असल्याने या मार्गावर खाद्यपदार्थांची मोफत सुविधा
 13. तब्बल 10 हजार स्वयंसेवक महाविराट सभेच्या निमित्ताने मराठा समाजाच्या सेवेत असतील
 14. मराठा समाजाच्या स्वयंसेवकांसोबत तब्बल दोन हजार पोलीसही बंदोबस्ताला आहेत.
 15. अग्निशमनच्या 10 गाड्या सभास्थळी तैनात


मराठा समाजाच्या या मराविराट सभेसाठी महाराष्ट्रातून लाखोंच्या संख्येने समाजबांधव येणार असल्याने वाहतुकीतही मोठे बदल करण्यात आले आहेत

 1. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बदल
 2. जालन्यातून बीडकडे जाणारी वाहतूक अंबड, घनसावंगी, आष्टी, माजलगाव मार्गे जाईल.
 3. संभाजीनगर येथून बीडकडे जाणारी वाहतूक पैठण, उमापूर फाटा मार्गे जाईल.
 4. बीडकडून जालना, संभाजीनगरकडे येणाऱ्या वाहतुकीतही बदल

हे ही वाचा 

जरांगे-पाटील आज महाविराट सभेत कोणता निर्णय घेणार?

7 कोटी आले कुठून? भुजबळांचा जरांगे पाटलांना सवाल

भुजबळ खोटे बोलून शपथविधीला गेले, शरद पवारांचा पलटवार

मुस्लीम समाजाचेही योगदान

संपूर्ण राज्यातून महासंख्येने येणाऱ्या मराठा समाजाची भूक भागवण्यासाठी मुस्लीम समाज पुढे आला आहे. गेवराई बायपासजवळ चाकूर, अहमदपूर, गेवराईमधील मुस्लीम समाजाने एक लाख मराठा बांधवांसाठी नाश्त्याची व्यवस्था केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी