जालन्यातील अंतरवली सरटी या गावात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आमरण उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली असून त्यांच्यावर सलाईन लावून उपचार करण्यात येत आहेत. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना बोलायलाही त्रास होत असून ते आंदोलनस्थळी झोपूनच उपचार घेत आहेत. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा अध्यादेश सरकार काढत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. ऑगस्ट महिन्यातील 29 तारखेपासून उपोषण करत सलेल्या मनोज जरांगे पाटील यांचा आज बुधवारी (6 सप्टेंबर) उपोषणाचा नववा दिवस आहे. त्यामुळे, आता राज्य सरकार मनोज जरांगे पाटील यांवह्या मागण्या मान्य करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मराठा आरक्षणयांसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात आंदोलन करणाऱ्या आंदोलयांकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. पोलिसांच्या लाठीचार्ज नंतरही आंदोलनकर्ते मागे हटले नाहीत. आरक्षणासंदर्भातील आपल्या मागण्यांवर ठाम राहत आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारला याकडे गांभीर्याने पाहण्यास भाग पाडले.
राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची आंदोलनस्थळी भेट घेऊन अरक्षणबाबतीत तोडगा काढण्यासंबंधी चर्चा केली. पण, जरांगे पाटील यांनी सरकारला 4 दिवसांची मुदत देऊन उपोषण सुरूच ठेवण्याचे स्पष्ट केले. 4 दिवसांनंतरही जीआर न निघल्यास पाण्याचाही त्याग करण्याचे जरांगे पाटील यांनी ठरवले आहे.
हे ही वाचा
भारत जोडो यात्रेच्या वर्षपूर्तीसाठी कॉँग्रेसचा मोदी सरकारविरोधात ‘स्पेशल’ कार्यक्रम
अरेरे, कोरोनात सामान्य माणूस आणखीन पिचला, राजकीय पक्ष गबर झाले!
मोदींवरील भाजपच्याच ट्विटचा दाखला देत आव्हाडांनी केली पंचाईत
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जरंगे पाटील यांची मनधरणी करण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याचा काही ही उपयोग झाला नाही. या शिष्टमंडळात मंत्री संदिपान भूमरे आणि अर्जुन खोतकर यांचाही समावेश होता.