संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही प्रत्येक मराठी माणसांच्या दृष्टीने फार महत्वाची चळवळ आहे (Maan’s son out of 107 also shed his blood here for United Maharashtra). मुंबईसह महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी १०७ जणांची आपल्या प्राणाची अहुती दिली. यामध्ये दुष्काळी माण तालुक्यातील किसन वीरकर यांचाही समावेश होता. किसन वीरकर हे माण तालुक्यातील म्हसवड परिसरातील रहिवाशी आहेत. परंतु माणचे विद्यमान आमदार जयकुमार गोरे हे वीरकर यांचे कधीही नाव घेत नाहीत. या पार्श्वभूमीवर लय भारीचे संपादक तुषार खरात यांनी मुंबईतील हुतात्मा चौकाला भेट दिली. हुतात्मा किसन वीरकर यांचे बलिदान महाराष्ट्राच्या तसेच माणवासियांच्या समोर आणण्याचा प्रयत्न तुषार खरात यांनी केला.
माणदेशी कादंबरीने मराठी भाषेला दिले २०० नवीन शब्द
माणचे लोकप्रतिनिधी या नात्याने जयकुमार गोरे यांनी या हुतात्मा स्मारकाला भेट देवून या ठिकाणी नतमस्तक व्हायला हवे, अशी भावना तुषार खरात यांनी यावेळी व्यक्त केली. किसन वीरकर यांच्यासारख्या १०७ जणांनी आपले बलिदान दिले. म्हणून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. वीरकर यांच्यासारख्यांनी बलिदान दिले नसते, तर महाराष्ट्राची निर्मितीच झाली नसती. महाराष्ट्राचे आमदार म्हणून जयकुमार गोरे व अन्य आमदारांना संधी मिळाली नसती. सर्व आमदार, खासदार यांनी निवडून आल्यानंतर पहिल्यांदा हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी नतमस्तक व्हायला हवे, अशी भावनाही तुषार खरात यांनी यावेळी व्यक्त केली.
Independence Day | माण खटावमध्ये आहे देशातील पहिली ग्रामपंचायत (भाग १)