30 C
Mumbai
Tuesday, November 14, 2023
घरमहाराष्ट्रदोन जातींचे सख्ख्ये भाऊ-बहीण

दोन जातींचे सख्ख्ये भाऊ-बहीण

राज्यात सध्या मराठा आरक्षणामुळे चांगलेच वातावरण तापले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी गेल्या दोन महिन्यांत दोन वेळा उपोषण केले होते. सध्या त्यांनी उपोषण सोडले असले तरीही सरकारवर मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत दबाव कायम असणार आहे. मराठ्यांना कुणबीत सामावून घेण्याची मागणी मराठा समाजाने केली आहे. यावर सरकार काम करत आहे. त्यांनी काही जुने संदर्भ तपासणीचे काम सुरू केले आहे. अशातच आता याच मुद्द्याला धरून सोशल मीडियाद्वारे काही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोत सख्ख्या भावांच्या दोन जाती असल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे जिल्ह्यातील आंबेगावमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. सख्ख्या भावांची जात वेगळी असल्याची माहिती समोर आली आहे. चित्रपटाच्या कथेला लाजवेल अशी घटना घडली आहे. यात दोन दिवंगत सख्ख्या भावांच्या वेगवेगळ्या जाती त्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर नमुद करण्यात आल्या आहेत. एका प्रमाणपत्रावर कुणबी तर दुसऱ्या प्रमाणपत्रावर मराठा असा उल्लेख केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मोठ्या भावाचे नाव जना आंबटकर आणि धाकट्याचे नाव सुदाम आंबटकर आहे. मोठ्या भावाच्या शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रावर कुणबी जातीची नोंद आहे. तर धाकट्या भावाचा शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रावर मराठा जातीची नोंद करण्यात आली. सध्याची परिस्थिती पाहता, मराठा आरक्षण आणि सख्ख्ये भाऊ एक कुणबी आणि एक मराठा हे वास्तव नाकारता येत नसून आता सरकार पेचात पडले आहे.

दोन जातींचे सख्ख्ये भाऊ-बहीण

हे ही वाचा

मोफत रेशन योजनेचा कालावधी आणखी सहा महिने वाढणार ?

दुष्काळावरून राजकीय कुरघोडीचा पाऊस

अंतरवाली सराटीत काल काय घडलं?

दरम्यान, आंबेगाव तालुक्यात ११२० नोंदी आहेत. आरक्षणामुळे पेटलेल वातावरण विजवण्यासाठी राज्य सरकार अहवाल तयार करत आहे. आंबेगाव तालुक्यात असे अनेक अहवाल सापडले आहेत. शाळेने याबाबत माहिती दिली आहे. येत्या काळात अशा अनेक घटना पाहायला मिळतील,असे सांगितले आहे. याचा परिणाम शिंदे समितीने केलेल्या अहवालावर होऊ शकतो. अशी घटना आता जामखेड तालुक्यात देखील घडली आहे.

दोन जातींचे सख्ख्ये भाऊ-बहीण

दुसरी घटना

जामखेड तालुक्यात सख्ख्या भाऊ आणि बहिणीच्या दाखल्यावर वेगवेगळ्या जातींचा उल्लेख केला आहे. राज्यातील ही दुसरी घटना आहे. जामखेड येथील दिगंबर भाऊराव मोरे यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर मराठा जातीचा उल्लेख केला आहे. तर त्यांची सख्खी बहीण चंद्रभागा मोरे यांच्या दाखल्यावर कुणबी असा उल्लेख केला आहे. हे फोटो सोशल मीडियावर व्हयरल होत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी