26 C
Mumbai
Wednesday, November 29, 2023
घरमहाराष्ट्रमराठा आरक्षणाच्या वाटेत अडचणींचे काटे, १ कोटी दस्तऐवजांत केवळ पाच हजार कुणबी...

मराठा आरक्षणाच्या वाटेत अडचणींचे काटे, १ कोटी दस्तऐवजांत केवळ पाच हजार कुणबी नोंदी

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे- पाटील यांनी 17 दिवस उपोषण केले. त्यानुसार राज्य सरकारने  निजामकालीन कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचं जीआर काढला होता. यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाने मराठवाड्यातील 1 कोटी दस्तऐवज तपासले आहे. मात्र, 1 कोटी दस्तऐवजांमध्ये केवळ पाच हजार कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. त्यामुळे मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळण्यात पुन्हा अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे हेच पाच हजार कुणबी नोंदी पुरावे समजून मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. दरम्यान, सरकारने निजामकालीन दस्तऐवज शोधण्यासाठी छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तालयाचे एक पथक हैदराबादला पाठविले होते. या पथकाने हैदराबादला जाऊन निजामकालीन अनेक अभिलेख तपासले. मात्र, पथकाच्या हाती फारसे काही लागले नसल्याने ते रिकाम्या हाताने परतल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे

मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर सरकारने आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. यासाठी सरकारने निजामकालीन दस्तऐवज शोधण्यासाठी छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तालयाचे एक पथक हैदराबादला पाठविले होते.

या पथकाने हैदराबादला जाऊन निजामकालीन अनेक अभिलेख तपासले. मात्र, पथकाच्या हाती फारसे काही लागले नसल्याने ते रिकाम्या हाताने परतल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे हैदराबाद येथील जुने दस्तऐवज उर्दू भाषेत असून, त्यामुळे अनेक अडचणी येत आहे. सोबतच, मराठा कुणबी असल्याचे खूप असे महत्वाचे दस्तऐवज यावेळी पथकाला मिळाले नाही.

मराठा आरक्षणाचा मुद्दा आणखीच तापला असून, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. दरम्यान, असे असतानाच दुसरीकडे सरकारने निजामकालीन कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचं जीआर काढला आहे. यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाने मराठवाड्यातील 1 कोटी दस्तऐवज तपासले आहे. मात्र, १ कोटी दस्तऐवजांमध्ये केवळ पाच हजार कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. त्यामुळे मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळण्यात पुन्हा अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे हेच पाच हजार कुणबी नोंदी पुरावे समजून मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयाने मराठवाड्यातील 1 कोटी दस्तऐवज तपासले आहे. यात बीड जिल्ह्यात 1022569 दस्तऐवज तपासले त्यात 1740 कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये 1516819 दस्तऐवज तपासले असून, त्यात 299 कुणबी नोंदी मिळाल्या आहेत.जालनामध्ये 1300000 दस्तऐवज तपासले, त्यात 2000 कुणबी नोंदी मिळाल्या. लातूरमध्ये 2251716 दस्तऐवज तपासले, त्यात 47 कुणबी नोंदी मिळाल्या.

हे सुद्धा वाचा

मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही : एकनाथ शिंदे
जयंत पाटलांनी वाजविली स्वत:चीच टिमकी, अजित पवार गटाने घेतले सगळ्यांना सामावून !
किल्लारी भूकंपाला ३० वर्ष पूर्ण, त्या रात्री ९ हजाराहून अधिक निष्पापांचा गेला बळी!

परभणीमध्ये 722299 दस्तऐवज तपासले असून, त्यात केवळ 5 कुणबी नोंदी मिळाल्या आहेत. नांदेडमध्ये 1640000 दस्ताऐवज तपासले असून, 150 नोंदी मिळाल्या आहेत. हिंगोलीमध्ये 1288000 दस्तऐवज तपासले असून, 18 कुणबी नोंदी आहेत. धाराशिवमध्ये 1851005 दस्तऐवज तपासले, त्यात 356 कुणबी नोंदी आहेत. त्यामुळे मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळण्यात पुन्हा अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कुठल्याही समाजाचे आरक्षण कमी करण्याची शासनाची भूमिका नाही, असे स्पष्ट करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, मराठा समाजाचे रद्द झालेलं आरक्षण पुन्हा मिळवून देताना इतर मागास समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. जुन्या कुणबी नोंदी असलेल्यांना कुणबी दाखले देण्यासंदर्भात निवृत्त न्यायमुर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीची कार्यवाही सुरू आहे.

राज्य शासन इतर मागास, भटक्या विमुक्त समाजाच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे शिंदे म्हणाले. सह्याद्री अतिथीगृह येथे इतर मागास वर्ग तसेच भटके- विमुक्त समाजातील विविध संघटनांसमवेत मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी ही माहिती दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी