30 C
Mumbai
Tuesday, August 2, 2022
घरमहाराष्ट्रमराठी भाषेला 'अभिजात' दर्जा मिळावा यासाठी शिंदेगटाचे खासदार अमित शहांना भेटले

मराठी भाषेला ‘अभिजात’ दर्जा मिळावा यासाठी शिंदेगटाचे खासदार अमित शहांना भेटले

मराठी भाषेला अभ‍िजात दर्जा मिळावा यासाठी शिंदे गटाचे खासदार केंद्रीय मंत्री अमित शहांना भेटले. खरंच शिंदे गटाच्या खासदारांच्या निवेदनानंतर या प्रकरणी केंद्र सरकार मराठी भाषेला अभ‍िजात दर्जा देईल का? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. कारण गेल्या १० वर्षांपासून मराठी भाषेला अभ‍िजात दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. राज्य सरकारने २०१३ मध्ये भाषा समिती स्थापन केली. त्या वेळेपासून ही मागणी सुरु आहे. मात्र केंद्र सरकारने याकडे लक्ष दिले नाही. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शहांचे चांगले संबंध निर्माण झाले आहेत. त्यामुळे हे काम पूर्ण होईल अशी आशा निर्माण झाली आहे.

या पूर्वी देशातील अनेक राज्यांच्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दर्जा मिळाला आहे. सर्वांत पाहिला अभिजात भाषेचा दर्जा 2004 मध्ये तामिळ भाषेला मिळाला. त्यानंतर 2005 मध्ये संस्कृतला हा दर्जा मिळाला. तर 2008 मध्ये कन्नड आणि तेलुगू भाषेला हा दर्जा मिळाला. 2013 मध्ये मल्याळम भाषेला हा मिळाला. 2014 मध्ये ओडिया भाषांना हा दर्जा मिळाला. देशातील 6 भाषांना अभिजात दर्जा मिळाला आहे. हे सगळे निर्णय यूपीए सरकारच्याच काळात झाले होते. आता मोदी सरकर कोणती भूमीका घेणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हा दर्जा प्राप्त झाल्यावर केंद्राकडून भाषेच्या विकासासाठी फंड दिला जातो. केंद्रीय विद्यापीठांमध्ये त्याची अध्यासने तयार होतात. विविध आंतरराष्ट्रीय स्कॉलरशिपही जाहीर होतात. दरम्यान शिंदे गटातील खासदारांच्या निवेदनानंतर याप्रकरणी केंद्र सरकार काय पावले उचलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जवळपास सर्वच राजकीय पक्षांचा या मागणीला अनेक वर्षांपासून पाठिंबा आहे. एखादी भाषा ‘अभिजात’ आहे हे ठरवण्याचे अधिकार हे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला आहेत. गृह मंत्रालयाने 2005 साली हे अधिकार सांस्कृतिक मंत्रालयाला दिले.

भाषेचा इतिहास हा प्रचिन असला पाहिजे. तसेच दुसर्‍या भाषांमधून उसनी न घेतलेली अस्सल साहित्यिक परंपरा असायला हवी. अभिजात भाषा ही वर्तमान काळातील भाषेपेक्षा वेगळी हवी. मराठी भाषेचा दर्जा ठरविण्यासाठी 2012 मध्ये प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. या अहवालात महारट्ठी-महरट्ठी-मऱ्हाटी-मराठी असा मराठीचा उच्चार बदलत गेला असे म्हटलेआहे. मराठी भाषा ही महाराष्ट्र हा प्रदेश अस्तित्वात येण्याच्या फार पूर्वीपासून प्रचलित होती.

मराठीचे वय किमान अडीच हजार वर्षं जुनेअसल्याचे पुरावे असल्याचे या अहवालात म्हटले आहे. या 128 पानी अहवालाच्या समारोपात समितीने काय म्हटले आहे. अकरा कोटी लोकांची मराठी जगातली 10 व्या ते 15 व्या क्रमांकाची भाषा आहे. देशातली ती एक महत्त्वाची राष्ट्रीय भाषा आहे. तिच्या ऐतिहासिक प्रवासाचे संदर्भ त्यामध्ये आहेत. 3 फेब्रुवारी 2022 ला संसदेत शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी मंत्र्यांना राज्यसभेत विचारले की मराठीला हा दर्जा कधी दिला जाणार आहे? राष्ट्रवादीच्या रजनी पाटील यांनीही हा प्रश्न विचारला. 2 जुलै 2019 ला तेव्हाचे सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद पटेल यांनी लोकसभेला सांगितले होते की हा प्रस्ताव सक्रीय विचाराधीन आहे.

हे सुद्धा वाचा :

अभिनेत्री दिया मिर्जाच्या कुटुंबातील लाडक्या व्यक्तीचे झाले निधन

Al-Zawahiri : ड्रोन हल्ल्यात अमेरिकेने केला जवाहिरीचा खात्मा

‘गद्दार म्हणणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढा’

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!