32 C
Mumbai
Wednesday, November 22, 2023
घरमहाराष्ट्रअमरावतीमध्ये मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेबाबतचा अहवाल मुख्यमंत्र्याकडे सुपूर्द

अमरावतीमध्ये मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेबाबतचा अहवाल मुख्यमंत्र्याकडे सुपूर्द

रिद्धपूर (जि.) अमरावती येथील मराठी भाषा विद्यापीठ (Marathi Language University) स्थापनेसाठी गठित करण्यात आलेल्या समितीने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेबाबतचा अहवाल सादर केला.आज मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि समितीचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी हा अहवाल सुपूर्द केला. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्रिमंडळातील सदस्य, मुख्य सचिव मनोज सौनिक उपस्थित होते. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री पाटील म्हणाले की, मराठी भाषा विद्यापीठ सुरू व्हावे, अशी मागणी अनेक वर्षापासून होती. या मागणीचे महत्व लक्षात घेऊन शासनाने समितीचे गठन केले होते. समितीने दोन महिन्यांत आपला अहवाल पूर्ण केला आहे.

मराठीतील पहिला आद्यग्रंथ म्हणून ओळख असलेला लीळाचरित्र हा ग्रंथ रिद्धपूरमध्ये उदयास आला. येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेची घोषणा राज्य अर्थसंकल्पात करण्यात आली होती. मराठी भाषा विद्यापीठात विविध ज्ञानशाखा, शिक्षणक्रम आणि अभ्यासक्रम राबविताना विद्यार्थी रोजगार क्षम होतील याचाही विचार करण्यात आला आहे. पारंपरिक विद्यापीठांपेक्षा मराठी भाषा विद्यापीठ महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा वेगळेपण केंद्रस्थानी ठेऊन अभ्यासक्रमांच्या माध्यमातून संस्कृतीचे संवर्धन आणि जतन करण्यात येईल, असे समितीचे अध्यक्ष डॉ. मोरे यांनी सांगितले.

अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर हे महानुभाव पंथाचे प्रमुख केंद्र असून मराठी साहित्याच्या विकासात त्याचं महत्त्वाचं योगदान आहे. रिद्धपूरचं हे महत्व लक्षात घेऊन त्या ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार असल्याची महत्त्वाची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती.

मराठी भाषेतील आद्य साहित्यिक अशी ओळख असलेल्या चक्रधर स्वामींच्या (Chakradhar Swami) नावानं रिद्धपूर या ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठ (Marathi Language University) स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली होती. या ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करावं ही मागणी अनेक वर्षापासून करण्यात येत होती.

मराठीतील पहिला आद्यग्रंथ म्हणून ओळख असलेला लीळाचरित्र हा ग्रंथ रिद्धपूरमध्ये उदयास आला. म्हाइंभटानी तो वाजेश्वरी या ठिकाणी लिहिला असल्याची नोंद आहे. मराठी साहित्याला महानुभाव पंथीयांचा मोठा वारसा लाभला असून महानुभाव पंथाशी संबंधित जवळपास 30 हजार ग्रंथ असल्याची नोंद आहे.

रिद्धपुर हे अमरावती जिल्ह्यात असून श्रीक्षेत्र रिद्धपूर ही महानुभावपंथांचीच नव्हे, तर मराठी वाङ्मयाचीसुद्धा काशी म्हणून ओळखली जाते. या भूमिमध्ये मराठीतील पहिला हस्तलिखित आद्यग्रंथ ‘लीळाचरित्र’ लिहिला गेला. याठिकाणी लीळाचरित्रासह स्मृतिस्थळ, गोविंदप्रभू चरित्र, दृष्टांतपाठ, सूत्रपाठ, मूर्तीप्रकारासारखे ग्रंथ लिहिले गेले.त्याचप्रमाणे सहा हजारहून अधिक ग्रंथ या ठिकाणी लिहले गेल्याने या भूमीला विशेष महत्व आहे.

हे सुद्धा वाचा 

पनवेल-उरणमध्ये शेकापचे जोरदार कमबॅक
मराठा आरक्षणासंदर्भात निवृत्त मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसलेंच्या अध्यक्षतेखाली सल्लागार मंडळ स्थापन
दोन्ही सभागृहात हॉटलाईन यंत्रणा कार्यान्वित करणे आवश्यक- निलम गोऱ्हे

रिद्धपुर हे श्री गोविंदप्रभू, चक्रधर स्वामी, श्री नागदेवाचार्य यांच्यासारख्या महापुरुषांनी वास्तव्य केलेली भूमी आहे. माहीम भट्ट, केशीराज व्यास, महदाईसा यांच्यासारख्या प्रज्ञावंतांनी याच ठिकाणी मराठी भाषेला झळाळी दिली. समतेचा विचार 13 व्या शतकात याच मातीत जन्मलेल्या गोविंदप्रभुंनी मांडला. चक्रधरांना हिंदू धर्मातील अस्पृश्यता, स्त्री दास्य, मांसाहार यासारख्या गोष्टी मान्य नव्हत्या. आचारधर्माचा आत्मा होऊन बसलेली मूल्ये त्यांना मान्य नसल्यामुळे श्री चक्रधरांनी महानुभाव पंथाची स्थापना रिद्धपुरमध्ये केल्याचे अनुयायी सांगतात.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी