34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रMedical Education In Marathi : एमबीबीएसचे शिक्षण आता मराठीमधून घेता येणार

Medical Education In Marathi : एमबीबीएसचे शिक्षण आता मराठीमधून घेता येणार

मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश सरकारने एमबीबीएसचे शिक्षण हिंदीतून देण्याची घोषणा केल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने सुद्धा वैद्यकीय अभ्यासाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वास्तविक महाराष्ट्रात एमबीबीएसचे शिक्षण मराठीतून घेता येणार आहे.

मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश सरकारने एमबीबीएसचे शिक्षण हिंदीतून देण्याची घोषणा केल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने सुद्धा वैद्यकीय अभ्यासाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वास्तविक महाराष्ट्रात एमबीबीएसचे शिक्षण मराठीतून घेता येणार आहे. या संदर्भात महाराष्ट्र सरकारने नुकतीच एक घोषणा केली आहे. सरकारने घेतलेल्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे इंग्रजी येत नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी पदवी स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी व पुढील प्रवेश घेण्यासाठी यामुळे बऱ्यापैकी सोपे होणार आहे. पुढील वर्षीपासून वैद्यकीय शिक्षणही मराठी भाषेतून होणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही मदत होणार असल्याचे महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

राज्याचे शिक्षणमंत्री गिरीश महाजन पुढे म्हणाले की, महाराष्ट्र एक पाऊल पुढे गेला आहे. राज्यात एमबीबीएस व्यतिरिक्त आयुर्वेदिक, होमिओपॅथी, बीडीएस आणि इतर नर्सिंगचे शिक्षण मराठीतून घेण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की याआधी मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश सरकारने वैद्यकीय अभ्यास हिंदीतून करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता महाराष्ट्रात देखील मार्तृभाषेतून एमबीबीएसचे शिक्षण देण्यात येणार आहे.

या योजनेसंदर्भात योग्य ती पाऊले उचलली जावीत यासाठी राज्य सरकारकडून एक विशेष समिती स्थापन केली जाणार आहे. जी समिती राज्य सरकारकडून तयार करण्यात येणार आहे, ती या योजनेचा परिपूर्ण अभयास देखील करणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमात शिक्षण घेतले आहे किंवा ज्यांना इंग्रजीत अडचण आहे त्यांच्यासाठी मराठी अभ्यासक्रम फायदेशीर ठरेल, अशी माहिती राज्याचे शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्याकडून देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

Safran Project : आता आणखी एक प्रकल्प गेला महाराष्ट्राच्या बाहेर

Corona News : सर्दीमुळे नाक वाहणे आहे कोरोनाचे लक्षण! जाणून घ्या सर्व अपडेट

Yoga Foundation Course : मोरारजी देसाई इन्स्टिट्यूटमधील योग विज्ञान फाउंडेशन अभ्यासक्रमासाठी नोंदणी सुरू! अशाप्रकारे करा अर्ज

राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर दोन प्रकारचे तर्कवितर्क लढवले जात आहेत. सरकारला पाठिंबा देणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे की, यामुळे डॉक्टरांना रुग्णांना चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होईल आणि डॉक्टर रुग्णांना स्थानिक भाषेत सहज समजावून सांगू शकतील. तर दुसरीकडे इतर लोकांचे म्हणणे आहे की, विश्वास ठेवला तर असे डॉक्टर फक्त महाराष्ट्र किंवा भारतापुरते मर्यादित असतील.

दरम्यान, या निर्णयामुळे राज्यातील मराठीमधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. कारण मराठी भाषेमधून शिक्षण घेतल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण इंग्रजीमधून घेताना अनेक समस्यांना समोरे जावे लागते. पण हेच शिक्षण मराठीमधुन झाल्यानंतर याचा मोठा फायदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होणार आहे,

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी