29 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रमेट्रो 2 अ प्रकल्पातील कामचुकार कंत्राटदारांना केवळ 36 लाखांचा दंड; माहिती अधिकारातून...

मेट्रो 2 अ प्रकल्पातील कामचुकार कंत्राटदारांना केवळ 36 लाखांचा दंड; माहिती अधिकारातून बाब उघड

दहिसर पूर्व ते अंधेरी पश्चिम या बहुप्रतिक्षित मेट्रो 2 अ चे (Metro 2A project) उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. हा टप्पा पूर्ण करण्यास कंत्राटदाराला 36 महिन्यांची मुदत वाढवून दिली होती. या कामचुकार कंत्राटदारांना केवळ 36 लाखांचा दंड (contractors fine) आकारल्याची माहिती आरटीआय (RTI) कार्यकर्ते अनिल गलगली (Anil Galgali) यांना दिल्ली मेट्रो रेल्वे कॉपोरेशनने (Delhi Metro Rail Corporation) दिली आहे. अनिल गलगली म्हणाले, काम पूर्ण होण्यात झालेली दिरंगाई लक्षात घेता दंड आकारण्यात एमएमआरडीएने कंजुसपणा दाखविला आहे. यामुळे प्रकल्प वेळेत पूर्ण होत नाही.(Metro 2A project defaulting contractors fined only 36 lakhs)

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमएमआरडीएकडे मेट्रो कामाची सद्यस्थिती आणि कंत्राटदारांवर आकारलेल्या दंडात्मक कारवाईची माहिती मागितली होती. दिल्ली मेट्रो रेल्वे कॉपोरेशनने अनिल गलगली यांस कळविले की, दहिसर पूर्व ते अंधेरी पश्चिम या मेट्रो 2 अ ही सेवा 31 डिसेंबर 2019 रोजी सुरु करण्याचे निश्चित करण्यात आले होते. पहिला टप्पा दहिसर पूर्व पासून डहाणूकर वाडी ही सेवा 2 एप्रिल 2022 रोजी सुरु करण्यात आली आहे. दुसरा टप्पा जानेवारी 2023 रोजी पूर्ण करण्यात आला. त्याला 36 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. सिव्हिल कामात सुरक्षेचे उल्लंघन आणि साईटवर सुरक्षा सुधार बाबतीत सुरक्षा दंड आकारला आहे. मात्र त्याची माहिती दिली नाही.

हे सुद्धा वाचा
बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप; पैलवानांचे जंतर-मंतरवर आंदोलन

भारतात येणार कॅन्सर त्सुनामी; कर्करोगतज्ज्ञ डॉ. जेम अब्राहम यांचा इशारा

आमदार कपिल पाटलांची सत्यजित तांबे यांना साथ

तर इलेक्ट्रिकल कामात करण्यात आलेल्या दिरंगाईबाबत 36 लाखांचा दंड आकारला आहे. यात माविन स्विचगर्स अँड कंट्रोल या कंत्राटदारांस 4.44 लाख रुपये, स्टर्लिंग अँड विल्सन व सिमेचेल इलेक्ट्रिक या कंत्राटदारांस 1.50 लाख रुपये, जॅक्सन या कंत्राटदारांस 1.53 लाख रुपये, केटीके ग्रुप चीन या कंत्राटदारांस 28.54 लाख रुपये इतका दंड आकारला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी