31 C
Mumbai
Saturday, September 3, 2022
घरमहाराष्ट्रAbdul Sattar : अबब ! मंत्री अब्दुल सत्तार यांच्या शिक्षण संस्थेत 12...

Abdul Sattar : अबब ! मंत्री अब्दुल सत्तार यांच्या शिक्षण संस्थेत 12 शिक्षक बोगस

शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या संभाजी नगरमध्ये असलेल्या नॅशनल एज्युकेशन सोसायटीमध्ये १२ शिक्षकांकडे टीईटीची बोगस प्रमाणपत्रे असल्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडून आरोप करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठा घोटाळा असलेल्या टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावे आल्यानंतर शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. परंतु आता त्यांच्या संभाजी नगरमध्ये असलेल्या नॅशनल एज्युकेशन सोसायटीमध्ये १२ शिक्षकांकडे टीईटीची बोगस प्रमाणपत्रे असल्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडून आरोप करण्यात आले आहे. त्यामुळे मंत्री अब्दुल सत्तर यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, अब्दुल सत्तार यांनी अद्यापही या प्रकरणाबाबत उघडपणे बोलणे टाळले आहे. त्यामुळे टीईटी घोटाळ्यात अब्दूल सत्तार यांचा किती समावेश आहे, हे कळू शकलेले नाही. परंतु टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावे येऊन सुद्धा सत्तारांना शिंदे-भाजप सरकारमध्ये मंत्रिपद देण्यात आले आहे.

टीईटी घोटाळा हा पुण्यातील सायबर क्राईम पथकाकडून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर या घोटाळ्यात मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावे बाहेर आल्याने एकच खळबळ माजली. पण आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अब्दुल सत्तार यांच्या नॅशनल एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेतील आणखी १२ शिक्षकांकडे टीईटीचे बोगस प्रमाणपत्र असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावे या प्रकरणात आलेली आहेत. अब्दुल सत्तार यांच्याकडून आरोप फेटाळण्यात आले तरी माझ्याकडे त्यांच्या मुलींच्या वेतनाची कागदपत्रे आहेत, असा दावा देखील अंबादास दानवे यांच्याकडून यावेळी करण्यात आला आहे. दरम्यान, या या सर्व प्रकरणाची कसून चौकशी झाली पाहिजे. तसेच या बोगस प्रमाणपत्र प्रकरणी सत्तार यांची ही चौकशी झाली पाहिजे अशी मागणी दानवे यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

Abdul Sattar : शिक्षक भरती घोटाळ्याचे धागेदोर अब्दुल सत्तार यांच्यापर्यंत !

TET Scam : टीईटी घोटाळ्यातील अपात्र शिक्षकांचे पगार झाले बंद

Abdul Sattar : अब्दुल सत्तारांच्या अडचणी संपेनात, निवडणूक पत्रावरून होणार चौकशी

दरम्यान, शिक्षक भरती प्रक्रियेतील हा सर्वात मोठा घोटाळा असून पुणे सायबर पोलिसांकडून हा घोटाळा उघड करण्यातून आला होता. २०१९ मध्ये घेण्यात आलेली शिक्षक भरतीची टीईटी परीक्षा ही उत्तीर्ण करण्यासाठी तब्ब्ल सात हजार ८८० उमेदवारांकडून लाखोंच्या घरात रक्कम घेण्यात आली होती, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. सदर घोटाळा हा पुणे सायबर पोलिसांकडून उघडकीस आणण्यात आला. यामध्ये टीईटी परीक्षेला बसलेले ७८०० विद्यार्थी हे अपात्र असल्याची माहिती पुणे सायबर पोलिसांकडून करण्यात आलेल्या तपासात उघड झाली. तसेच आता या घोटाळ्यातील अपात्र ठरलेल्या ७८०० बोगस शिक्षकांच्या नावाची यादी ही प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षण अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येणार आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी