32 C
Mumbai
Thursday, December 8, 2022
घरमहाराष्ट्रCrime : मंत्री दादा भुसेंचा डॅशिंग अवतार; बंगल्यात घुसून दरोडेखोराला पकडले

Crime : मंत्री दादा भुसेंचा डॅशिंग अवतार; बंगल्यात घुसून दरोडेखोराला पकडले

मंत्री दादा भूसे यांनी धाडस दाखवत काही नागरिकांसह बंगल्यात प्रवेश केला आणि दरोडेखोराच्या डोक्याचे केस पकडून त्याला बंगल्याबाहेर ओढत आणले.

राज्याचे कॅबिनेट मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या धाडसाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. नाशिकमध्ये (Nashik) एका बंगल्यात पिस्तूल घेऊन एक दरोडेखोर (Robber) पिस्तूल घेऊन घुसला होता. यावेळी बंगल्यात तीन महिला होत्या त्यांना पिस्तूलाचा धाक दाखवून सोने लूटण्याचा प्रयत्न हा दरोडेखोर करत होता. यावेळी मंत्री दादा भूसे यांनी धाडस दाखवत काही नागरिकांसह बंगल्यात प्रवेश केला आणि दरोडेखोराच्या डोक्याचे केस पकडून त्याला बंगल्याबाहेर ओढत आणले. त्यानंतर या दरोडेखोराला पोलिसांच्या ताब्यात दिले.
दरम्यान मंत्री दादा भुसे यांनी दरोडेखोराला तंबी देत तुझ्यासोबत कोण कोण होते, तुझ्या साथीदारांची नावे सांग असे विचारत त्याची चौकशी देखील केली. यावेळी दरोडेखोर म्हणाला, माझ्यासोबत कोणीही नव्हते, मी एकटाच होतो. यावर दादा भुसे संतापले आणि त्याच्या केसांना पकडून त्याला खेचत खाली आणले. यावेळी तेथील नागरिकांनी देखील या दरोडेखोराला चोपमार दिला.
दरम्यान या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हीडिओमध्ये मंत्री दादा भुसे आणि काही नागरिक बंगल्यात जाण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. यावेळी संतापलेल्या नागरिकांना भुसे शांत करत असल्याचे देखील दिसत आहे. नागरिक दरोडेखोराला बेदम चोप देण्याचा प्रयत्न करत असातना दादा भुसे यांनी नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. या दरोडेखोराला उपस्थित काही लोकांनी ओळखल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. पोलिस या सगळ्या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. कृष्णा अन्ना पवार असं या आरोपीचं नाव आहे.

हे सुद्धा वाचा :

Rishi Sunak ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान!

Prithviraj Chavan : भाजप-शिंदे सरकारचा राज्याला फायदा नाही; माजी मुख्यमंत्र्यांची टीका

Aastha Sidana : बॉलिवूड अभिनेत्री आस्था सिदानाला ऑनलाईन गंडा; तब्बल इतक्या लाखांची फसवणूक

दरम्यान सध्या दिवाळीमुळे अनेक लोक दागिने, कपडे, महागड्या वस्तू खरेदी करत असतात, दिवाळीत दागदागिने, रोकड हाती लागेल या उद्देशाने दरोडेखोर पाळत ठेऊन दरोडे टाकतात. नाशिकमध्ये घडलेला हा प्रकार देखील असाच आहे, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी भरदिवसा हा दरोडेखोर एका बंगल्यात घुसला आणि घरातील महिलांना धमकावत दरोडा टाकण्याचा प्रयत्न करत होता. मात्र वेळीच मंत्री भुसे आणि नागरिकांची मदत झाल्यामुळे दरोडा टाकण्याचा त्याचा प्रयत्न फसला. मंत्री भुसे आणि नागरिकांनी दरोडेखोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!