28.7 C
Mumbai
Sunday, May 14, 2023
घरमहाराष्ट्रमंत्री, आमदार घेणार ज्ञानपीठ विजेत्या साहित्यिकांच्या साहित्याचा आस्वाद

मंत्री, आमदार घेणार ज्ञानपीठ विजेत्या साहित्यिकांच्या साहित्याचा आस्वाद

कविकुलगुरू कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून विधानमंडळातील मराठी भाषा समितीतर्फे ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या मराठी लेखकांच्या साहित्यावर आधारित “मराठी साहित्याची ज्ञानयात्रा” या कार्यक्रमाचे आयोजन सोमवार, (दि. २७) रोजी दुपारी ३.०० ते ५.०० यावेळेत विधान भवन येथील मध्यवर्ती सभागृहात करण्यात आले आहे. वि.स.खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, भालचंद्र नेमाडे या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या मराठी लेखकांच्या साहित्यकृतींचे अभिवाचनाद्वारे संस्मरण यावेळी करण्यात येईल. (Ministers, MLAs will enjoy the literature of Jnanpith winning writers)

हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुश्री फडणीस या करणार असून कार्यक्रमाची संहिता उत्तरा मोने यांनी तयार केली आहे. मराठी भाषेची, मराठी साहित्याची उंची वाढविणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यकृतींचे अभिवाचन या कार्यक्रमात सुप्रसिध्द अभिनेते डॉ. गिरीश ओक, लीना भागवत हे करतील. नचिकेत देसाई, धनश्री देशपांडे आणि अभिषेक नलावडे हे याप्रसंगी कविता गायन करतील.

हे सुद्धा वाचा

कोल्हापुरातील कणेरी मठात 50 गाईंचा मृत्यू, 30 गायी गंभीर; शिळ्या अंन्नातून विषबाधा

नवाब मलिक आजारीच, मुंबई उच्च न्यायालयाने केले मान्य

अरेच्च्या : २४ तासांसाठी भिकारी बनला ‘हा’ प्रसिद्ध युट्यूबर

विधानमंडळातील या कार्यक्रमाच्या संयोजनाची जबाबदारी मिती क्रिएशन्स सांभाळत आहे. या कार्यक्रमास दोन्ही सभागृहांचे सन्माननीय सदस्य, पत्रकार, साहित्यप्रेमी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत आणि मराठी भाषा समितीचे उप सचिव विलास आठवले यांनी केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी