30 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रMission Baramati : 'स्वत:ला पक्षात उमेदवारी मिळेना अन् बारामती जिंकणार म्हणे...'

Mission Baramati : ‘स्वत:ला पक्षात उमेदवारी मिळेना अन् बारामती जिंकणार म्हणे…’

केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांच्या बारामतीच्या दौऱ्यानिमित्त राज्यात भाजपकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या दौऱ्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आजपासून बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या या ‘मिशन बारामती’वर मात्र विरोधी गटाकडून जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहेत. राष्ट्रवादी नेत्या रुपाली पाटील यांनी या मिशन बारामतीवर टीका करीत चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सडकून टीका केली आहे. ज्यांना स्वत:ला विधानसभेची उमेदवारी मिळाली नाही ते बारामती जिंकणार होय असे म्हणत मिश्किल टोला सुद्धा पाटील यांनी लगावला आहे. दरम्यान भाजपचे हे बारामती मिशन राज्यात सध्या चांगलाच वादाचा मुद्दा ठरत असल्याने सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा आमने सामने पाहालया मिळणार आहेत.

भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या खांद्यावर ‘मिशन बारामतीची जबाबदारी टाकल्यामुळे बावनकुळे अगदी काळजीपूर्वक सगळ्याच गोष्टींकडे लक्ष देत असल्याचे दिसत आहेत. पक्षातील संघटन बांधणी आणि केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमन यांच्या दौऱ्याची पूर्वतयारी पाहण्यासाठी आजपासून ‘मिशन बारामती’ची सुरवात झाली आहे. ज्या कन्हेरीच्या हनुमान मंदिरात पवार कुटुंबियांच्या प्रचाराचा नारळ फुटतो अगदी तिथेच चंद्रशेखर बावनकुळे यांनी आशिर्वाद घेऊन त्यांचा दौरा सुरू केला आहे. भाजपने सुरू केलेल्या मिशनवर विरोधी गटातून टीका करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा…

Eknath Shinde : जयंत पाटलांचे मुख्यमंत्री एकनाथ‍ शिंदेना पत्र

Asia Cup 2022: भारताला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी श्रीलंकेविरूद्ध जिंकणे अंत्यत निकडीचे

Navneet Rana : नवनीत राणांना ‘तोंड सांभाळण्याचा’‍ शिवसेनेचा इशारा

या संपुर्ण परिस्थितीवर भाष्य करत राष्ट्रवादी नेत्या रुपाली पाटील यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये पाटील लिहितात, जेव्हा संघटन मजबूत होते तेव्हा संघर्ष करण्याची ताकद निर्माण होते, त्यानंतर मात्र चांगले-चांगले गड उद्ध्वस्त होतात, हा देशाचा इतिहास आहे. गड हा कोणाचा नसतो, जनतेने तो बनविलेला असतो त्यामुळे जनताच देश हितासाठी बदल करते असे म्हणत पवारांच्या बालेकिल्ल्यात थेट 2024 निवडणुकांचे रणशिंग फुंकलं आहे, असे म्हणून बावनकुळे यांनी सुरू केलेल्या मिशन बारामतीवर त्यांनी टीका केली आहे. पुढे रुपाली पाटील म्हणतात, स्वत:ला पक्षात उमेदवारी मिळेना अन् बारामती जिंकणार म्हणे…, असे म्हणून पाटील यांनी बावनकुळे यांना चिमटा काढला आहे.

दरम्यान 2024 साली पार पडणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने चांगलीच कंबर कसली आहे. राज्यात प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर भाजपने पहिलीच मोठी जबाबदारी चंद्रकांच बावनकुळे यांच्या खांद्यावर टाकली आहे. भाजपचा पहिला वार शरद पवार यांच्या बारामतीत केल्यामुळे राज्यातील राजकारण आणखी गडद होण्याची चिन्हे दिसत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी