28 C
Mumbai
Sunday, September 4, 2022
घरमहाराष्ट्रManisha Kayande : भंडारा बलात्कार पीडितेची आमदार मनिषा कायंदे यांनी घेतली भेट

Manisha Kayande : भंडारा बलात्कार पीडितेची आमदार मनिषा कायंदे यांनी घेतली भेट

सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की आज महाराष्ट्र वाऱ्यावर पडलेला आहे, असे म्हणून या प्रकरणावरमनिषा कायंदे यांनी तीव्र संताप व्यक्त करत त्यांनी राज्य सरकारवरच ताशेरे ओढले आहेत.

सामुहिक बलात्काराच्या घटनेने संपुर्ण भंडारा जिल्हा हादरून गेला आहे. मदतीच्या बहाण्याने एका 35 वर्षीय महिलेवर सामुहिक बलात्कार करून तसेच तिला रस्त्यावर फेकून टाकल्याची धक्कादायर घटना घडली आहे. या घटनेनंतर अवघा महाराष्ट्र हळहळला. शिवसेनेच्या आ. डॉ. मनीषा कायंदे, सुषमा अंधारे व प्रवक्त्या संजना घाडी या त्रीसदस्यीय शिष्ट मंडळाने सदर पीडितेची भेट घेऊन पीडितेच्या प्रकृतीची व तिच्यावर करण्यात येत असलेल्या उपचारांची माहिती घेतली. या पीडितेला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे असून अद्याप पीडिता बेशुद्ध अवस्थेतच आहे. पीडित महिलेची भेट घेऊन डॉ. मनीषा कायंदे यांनी भेटीबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर जारी केला आहे.

गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी असणारी 35 वर्षीय महिला नवऱ्याने वाऱ्यावर सोडल्याने ती तिच्या बहिणीकडे राहत होती. दरम्यान बहिणीकडे राहत असताना घरगुती भांडणात खटके उडाल्याने या महिलेने तात्काळ बहिणीचे घर सोडले आणि तडक माहेरचा रस्ता धरला. चालत निघालेल्या या महिलेला सुरवातील एका कारचालकाने मदतीचे आमिष दाखवले आणि त्याने फसवणूक करत तिच्यावर दोनदा बलात्कार केला. कारचालकाच्या तावडीतून पीडित महिलेने कशीबशी सोडवणूक करून घेत पळ काढला.

दरम्यान खूप चालल्यामुळे महिलेला तहान लागली होती, त्यावेळी तिथे पंक्चर काढण्याचे दुकान दिसले. तिथे ती पाणी पिण्यास थांबली, त्यावेळी पंक्चर काढण्याच्या दुकानाच्या मालकाने तिची चौकशी केली आणि तिला घरी सोडण्याचे आश्वासन दिले, परंतु त्याची सुद्धा त्यावेळी नियत फिरली आणि त्याने त्यांच्या मित्राला बोलावून घेत कारधा जंगलात आळीपाळीने बलात्कार केला आणि पीडित महिलेला निवस्त्र अवस्थेत तिथेच टाकून पळ काढला. सदर घटना 5 ऑगस्ट रोजी उघडकीस आली.

हे सुद्धा वाचा

Breaking : हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा!

Azadi ka Amrit Mahotsav : भाजपच्या दृष्टीने देशाला २०१४ मध्ये स्वातंत्र्य मिळाले, मग अमृतमहोत्सवाची इव्हेन्टबाजी कशाला?

Shrikant Deshmukh : महिलेच्या फसवणूक प्रकरणी श्रीकांत देशमुखांना न्यायालयाचा तुर्तास दिलासा

सामुहिक बलात्कारामुळे पीडित महिला रात्रभर प्रचंड रक्तस्राव झाल्याने बेशुद्धाअवस्थेत सापडली, स्थानिकांनी तिला पाहिले आणि नागपुरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान या घटनेची नोंद अवघ्या महाराष्ट्राने घेतली आणि तीव्र संताप व्यक्त केला. या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून सुद्धा उलट – सूलट प्रतिक्रिया उमटल्या आणि काहींनी तर तात्काळ जाऊन पीडितेची भेट घेतली. शिवसेनेकडून सुद्धा त्रीसदस्यिय शिष्ट मंडळ 7 ऑगस्ट रोजी नागपूरकडे रवाना झाले आणि त्यांनी नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सुधीर गुप्ता यांची भेट घेऊन पीडितेवर सुरू असणाऱ्या उपचारांची व्यवस्थित माहिती घेतली.

यानंतर डॉ. मनीषा कायंदे यांनी सोशल मिडीयावर एक व्हिडिओ जारी केला आहे. यावेळी कायंदे म्हणतात, तिला भेटण्यासाठी आम्ही आज नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात गेलो आणि त्या ठिकाणी पोलिसांची भेट घेतली, डाॅक्टरांकडून तिची परिस्थिती समजून घेतली. तिला शिवसेने तर्फे आम्ही मदत देखील करण्याची तयारी दाखवली परंतु हे सगळं असताना मात्र पोलिस आणि डाॅक्टर यांच्यावर दबाव होता. नातेवाईकांना कोणाशी बोलू दिले जात नव्हते, इतकी दहशत त्या ठिकाणी निर्माण करण्यात आली होती, असे म्हणून कायंदे यांनी रुग्णालयात काय घडले हे सांगितले.

मनीषा कायंदे पुढे म्हणाल्या, आम्ही डिआयजी संदिप पाटील यांना भेटलो, त्यानंतर पोलिस महानिरीक्षक भंडारा मतानी यांना देखील भेटलो आणि त्यांच्याकडून पुर्ण परिस्थिती समजून घेतली. यामध्ये आम्ही तीन – चार मागण्या केलेल्या आहेत. आरोपींना कडक शासन करण्यात यावे, तिला मनोधर्य योजनेतून किमान दहा लाखांची मदत तिला मिळायला पाहिजे आणि त्या महिलेचे पुर्णपणे पुनर्वसन केले पाहिजे असे म्हणून शिवसेना त्रिसदस्यीय शिष्ट मंडळाच्या मागण्या यावेळी त्यांनी सांगितल्या.

परंतु या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की आज महाराष्ट्र वाऱ्यावर पडलेला आहे, असे म्हणून या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त करत त्यांनी राज्य सरकारवरच ताशेरे ओढले आहेत. याप्रसंगी नागपूर युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम राठोड , किशोर कुम्हेरिया, नितीन सोळंकी जिल्हा समन्वयक, वंदना लोणकर जिल्हा संघटक रामटेक तसेच जिल्ह्यातील महत्वपूर्ण पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी