29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर भारतीय लोकांच्या मतांसाठी भाजप नेत्याकडून ही स्टंटबाजी :  रोहित पवार

उत्तर भारतीय लोकांच्या मतांसाठी भाजप नेत्याकडून ही स्टंटबाजी :  रोहित पवार

टीम लय भारी

मुंबई: महाराष्ट्रात उत्तर प्रदेशातील तरुणांना चांगली नोकरी मिळावी यासाठी उत्तर प्रदेशात मराठी शिकवण्याची मागणी भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी मुख्यमंत्री योगींकडे केली आहे. यावर रोहित पवार यांनी भाष्य केले आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उत्तर भारतीय लोकांच्या मतांसाठी भाजप नेत्याकडून ही स्टंटबाजी सुरु असा आरोप त्यांनी भाजपवर केला आहे. रोहित पवार (rohit pawar) यांनी सोशल मीडीयावर एक पोस्ट शेअर केली आहे. रोहित म्हणतात की,

महाराष्ट्रात नोकऱ्या मिळाव्यात म्हणून UP तील तरुणांना मराठी शिकवण्याची मागणी मुंबईतील भाजपच्या एका नेत्याने UP च्या मुखमंत्र्यांना केल्याचं माझ्या वाचनात आलं. तिथल्या तरुणांना विरोध नाही पण त्यांना तिथंच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्या मुखमंत्र्यांनी प्रयत्न करायला हवेत.

पण त्याऐवजी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उत्तर भारतीय लोकांच्या मतांसाठी भाजप नेत्याकडून ही स्टंटबाजी सुरुय. असो. या निमित्तानं का होईना महाराष्ट्रात #मविआ सरकार आल्यापासून रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होत आहेत, हे तरी भाजप नेत्यांनी अप्रत्यक्षपणे मान्य केलं, हेही काही कमी नाही असा ही टोला त्यांनी लगावला आहे.

हे सुद्धा वाचा: 

मुंडे,महाजन,खडसे,फुंडकरांनी भाजपला बहुजन चेहरा दिलाय : एकनाथ खडसे

Prophet row: Owaisi, Nupur Sharma booked for spreading hate messages on social media

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी