28 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रशहाजीबापू पाटील सांगोल्यात परतले अन् म्हणाले, बोकडाचं मटण कसे ओरपायचे ते शिकवतो

शहाजीबापू पाटील सांगोल्यात परतले अन् म्हणाले, बोकडाचं मटण कसे ओरपायचे ते शिकवतो

टीम लय भारी 

सांगोला :काय झाडी… काय डोंगार…काय हाटील…” या एका डायलाॅगने अवघ्या राज्याला वेड लावले. राज्यातील बंडखोरीपेक्षा या डायलाॅगचीच चर्चा खूप झाली. ह्या डायलाॅगचे कर्ताधर्ता शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदार शहाजी बापू पाटील आता पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत “बोकडाचं मटण कसे ओरपायचे ते शिकवतो”, असे म्हणत राऊतांना चांगलेच फटकारले आहे.

सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजीबापू पाटील बंडखोरीनंतर अखेर 15 दिवसांनी आपल्या मतदारसंघात परतले आहेत. मतदारसंघात पाऊल टाकताच पाटील यांनी डरकाळ्या फोडायला सुरवात केली आहे. यावेळी संजय राऊतांवर निशाणा साधत आपल्या भाषणातून त्यांनी केलेल्या वक्तव्याचा यथोचितपणे समाचार घेतला आहे.

यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना शहाजीबापू पाटील म्हणाले, “संजय राऊतचं मनगट हे अंगठ्याएवढं आहे आणि ते कापून काढू, प्रेतं आणू अशा धमक्या देतात. तुझं तुलाच चालता येईना, सकाळी बशीभर पोहे खातो, सायंकाळी चपाती खाऊन झोपते. ये माझ्याकडे बोकड कसं वरपायचं, कोंबडी कशी तोडायची असते, शिकवतो. त्यानंतर अंगात रग येते. मनगटात ताकद येते. ज्यांच्या मनगटात ताकद असते, त्यांनीच बोलावं”, असे म्हणून पाटील यांनी राऊत यांची उजळणी घेतली आहे.

पदाचा गैरवार करण्याविषयी बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले, “उद्धव ठाकरेंमुळे संधी मिळाली आहे, म्हणून संजय राऊतांनी याचा गैरफायदा घेऊ नये. त्यांनी तातडीनं बोलणं बंद करावं, तरच उरलं – सुरलं ठाकरे घराणं राहिन, नाहीतर ठाकरे घराण्याला संपवण्याची सुपारी संजय राऊतांनी उचलली आहे”, असे म्हणून पाटील यांनी इशारावजा धोक्याची घंटा यावेळी बडवली.

दरम्यान, सांगोल्यात परतलेले आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोल्यात येताच जोरदार भाषण केले आणि संजय राऊत यांच्या प्रत्येक टीकेला उत्तर देत यावेळी आपल्या शिंदे गटाची पाठराखण केली.

हे सुद्धा वाचा…

राज ठाकरेंचं पत्र ‘इन्सपायरिंग‘ होतं – फडणवीस

रस्त्यावर धावणारी ‘जलपरी’ तुम्ही पाहिली का?

भाजप – शिंदे सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला?

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी