23 C
Mumbai
Thursday, January 16, 2025
Homeमहाराष्ट्रशेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे..विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे..विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर केले जोरदार आंदोलन

हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर “कापसाच्या झाल्या वाती सोयाबिनची झाली माती”, “शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या सरकारचा धिक्कार असो,”, अशा जोरदार घोषणाबाजी करत व हातात सोयाबीन, तूरची रोपं, गळ्यात कापसाच्या बोंडाच्या माळा घालून व सोयाबिन, तूर, कापूस या शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, धानाला बोनस मिळाला पाहिजे या मागणीसाठी जोरदार आंदोलन केले. (MLAs of Mahavikas Aghadi staged a strong protest on the steps of the legislature)

 

 

केंद्राचे शेतमालाचे आयात निर्यात धोरण चुकीचे असून हे सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणारे सरकार आहे अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. तसेच शेतकऱ्यांना शेतमालाला भाव मिळाला पाहिजे, अशी मागणीही दानवे यांनी लावून धरली. (MLAs of Mahavikas Aghadi staged a strong protest on the steps of the legislature)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी