27 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रMNS Against Rahul Gandhi : राहूल गांधींच्या विरोधात मनसे आक्रमक; पोलिसांनी नेत्यांना...

MNS Against Rahul Gandhi : राहूल गांधींच्या विरोधात मनसे आक्रमक; पोलिसांनी नेत्यांना ताब्यात घेतले

हूल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे कार्यकर्ते आज शेगावकडे निघाले होते. मात्र पोलिसांनी त्यांना चिखली (जि. बुडढाणा) या गावाजवळ अडवले. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी राहूल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच रस्त्यातच ठिय्या मांडून आंदोलन केले.

राहूल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भारतीय जनता पक्ष, शिंदे गट राहूल गांधी यांच्या वक्तव्याविरोधात आक्रमक झाला असताना आता महाराष्ट्र नवनिर्मान सेना देखील राहूल गांधी यांच्या वक्तव्यामुळे संतप्त झाली आहे. राहू गांधी यांची आज शेगाव येथे मोठी सभा होणार आहे. राहूल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे कार्यकर्ते आज शेगावकडे निघाले होते. मात्र पोलिसांनी त्यांना चिखली (जि. बुडढाणा) या गावाजवळ अडवले. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी राहूल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच रस्त्यातच ठिय्या मांडून आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी प्रकाश महाजन, अविनाश जाधव, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे यांना ताब्यात घतले असून चिखलीच्या शासकीय विश्रामगृहात ठेवले आहे.

राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे, आज त्यांची भारत जोडो यात्रा शेगाव येथे येणार असून तेथे राहूल गांधी यांची भव्य सभा होणार आहे. राहूल गांधी यांनी अकोल्याच्या सभेत सावरकरांच्या माफीनाम्याबाबत वक्तव्य केले. त्यानंतर राहूल गांधी यांना भाजप, शिंदे गट आणि मनसेने जोरदार विरोध केला. राहूल गांधी यांनी त्यानंतर पत्रकार परिषद घेत सावरकर यांच्या माफीनाम्याची कागदपत्रे पत्रकार परिषदेत सादर केली. त्यानंतर पुन्हा राजकीय वातावरण तापले. महाराष्ट्र नवनिर्मान सेनेने देखील राहूल गांधी यांना जोरदार विरोध केला आहे.

राहूल गांधी यांची शेगावमध्ये आज सभा होणार असून बुडढाणा ते शेगाव या मार्गावर लावलेले भारत जोडो यात्रेचे पोस्टर देखील महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज फाडून टाकले. तसेच आम्हाला शेगावला जाण्यापासून रोखले जात असल्याचा आरोप करत आम्ही शेगावला जाणारच असे देखील मनसेचे कार्यकर्ते म्हणाले.
हे सुद्धा वाचा :
Eknath Khadse : बंडखोर आमदारांसाठी गुवाहाटी म्हणजे प्रेयसीच्या आठवणीप्रमाणे : एकनाथ खडसे

Bhima Koregaon Case : आनंद तेलतूंबडे यांना जामीन मंजूर; पण काही दिवस तुरूंगातच रहावे लागणार

Mahavikas Aghadi : राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता

मनसेचे नेते अविनाश जाधव म्हणाले, राहूल गांधी यांच्या सभेत गोंधळ होणारच, आमच्या माणसांचा अपमान करणाऱ्या फालतू माणसाचे पोस्टर आम्ही फाडले आहेत, पोलिसांची वागणूक पाहता काँग्रेसचे नेते आम्हाला घाबरले आहेत, पोलिसांनी जरी मनसेच्या नेत्यांना अडवले असले तरी आमचा महाराष्ट्र सैनिक थांबणार नाहीत.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी