24 C
Mumbai
Friday, December 2, 2022
घरमहाराष्ट्रBharat Jodo Yatra : महाराष्ट्रातील तरूणांचे रोजगार मोदींनी हिरावून घेतले; राहूल गांधींचा...

Bharat Jodo Yatra : महाराष्ट्रातील तरूणांचे रोजगार मोदींनी हिरावून घेतले; राहूल गांधींचा हल्लाबोल

महाराष्ट्रातील एअरबस प्रकल्प, वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेला. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये गेले, कसे गेला? हे कोणालाही कळले नाही. राज्यातील लाखो कोटी रुपयांची गुंतवणुकही गेली व महाराष्ट्रातील तरुणांचे रोजगारही नरेंद्र मोदींनी हिरावून घेतले, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर केला.

महाराष्ट्रातील एअरबस प्रकल्प, वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेला. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये गेले, कसे गेला? हे कोणालाही कळले नाही. राज्यातील लाखो कोटी रुपयांची गुंतवणुकही गेली व महाराष्ट्रातील तरुणांचे रोजगारही नरेंद्र मोदींनी हिरावून घेतले, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर केला. नांदेड जिल्ह्यातील कृष्णूर एमआयडीसी येथील सभेत ते बोलत होते.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, दोन महिन्यापूर्वी ही पदयात्रा सुरू केली आणि आज महाराष्ट्रात आली आहे. उन्हा-तान्हात तुम्ही मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी झालात, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. दिवसभर 7-8 तास दररोज चालतो. शेतकरी, तरुण, महिला, यांच्या समस्या ऐकून घेतो. मला यांच्याकडून खूप काही शिकायला मिळते. रस्त्यावरून चालणे व गाडीतून चालणे यात फरक आहे. देश समजून घ्यायचा असेल तर रस्त्यावर चालले पाहिजे. रस्ते कसे आहेत ते आधी कळते, राज्याची अवस्था रस्त्यावरून कळते. शेतकरी, तरुण, यांच्याकडून ऐकतो तेव्हा वाईट वाटते. 6 वर्षापूर्वी नोटबंदी केली त्याचा परिणाम आता दिसू लागला आहे. नोटाबंदी व जीएसटीने देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्सुनामी आली. देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी केली.

सरकारी उद्योग खाजगी उद्योगपतींना विकले जात आहेत. सरकारी नोकऱ्या नाहीत. त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. पट्रोल, डिझेल, सिलिंडर गॅस महाग झाले. एकीकडे महागाई तर दुसरीकडे बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. जनतेचा आवाज मोदी सरकार ऐकत नाहीत. संसदेत बोलण्यास सुरू केले की लगेच माईक बंद केला जातो. देशातील तरुण लष्करात भरती होऊन देशसेवा करू पहात आहे पण नरेंद्र मोदींनी त्यावर पाणी फेरले आहे फक्त चार वर्षेच सेवा करा आणि घरी बसा अशी व्यवस्था करून ठेवली आहे, असे राहूल गांधी यावेळी म्हणाले.
हे सुद्धा वाचा :
Sanjay Raut Bail : संजय राऊत तुरूंगाबाहेर; शिवसैनिकांनी केले जल्लोषात स्वागत

GramPanchayat Election : राज्यात 7,751 ग्रामपंचायतींसाठी निवडणूका जाहीर; आचारसंहिता लागू

Sanjay Raut Bail : आता मी पुन्हा लढेन, कामाला सुरुवात करेन; संजय राऊतांची जामीन मिळाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया!

पुढे बोलताना राहूल गांधी म्हणाले, कोणालाही घाबरू नका, मनातील भिती काढून टाका. जो ही भिती घालवेल तो द्वेष पसरवू शकत नाही म्हणून मनातून भिती काढून टाका असे आवाहन राहुल गांधी यांनी केले. मुलगा व मुलगी यांच्यात भेदभाव करू नका, मुलींना समान वागणूक दिली पाहिजे. तसेच जो समाज, देश मुलींचा सन्मान कलत पाहो तो देश प्रगती करू शकत नाही त्यासाठी मुलागा मुलगी भेदभाव न करण्याचे आवाहन राहुल गांधी यांनी यावेळी केले.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!