27 C
Mumbai
Friday, December 9, 2022
घरमहाराष्ट्रMonsoon Alert : थंडीत पावसाचा दणका! 'या' जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट

Monsoon Alert : थंडीत पावसाचा दणका! ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट

पावसाची रजा संपली तशी थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली असता पुन्हा एकदा पाऊस बरसणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे. ऐन थंडीच्या दिवसात राज्यात पुन्हा पावसाळा अनुभवायास मिळणार असल्याने बळीराजापासून सगळेच जण पुन्हा बुचकळ्यात पडले आहेत.

राज्यातील परतीच्या पावसाच्या विश्रांतीनंतर अनेकांनी अखेर सुटकेचा निश्वास टाकला. पावसाची रजा संपली तशी थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली असता पुन्हा एकदा पाऊस बरसणार असल्याचे हवामान खात्याकडून (IMD) सांगण्यात येत आहे. ऐन थंडीच्या दिवसात राज्यात पुन्हा पावसाळा अनुभवायास मिळणार असल्याने बळीराजापासून सगळेच जण पुन्हा बुचकळ्यात पडले आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात नोव्हेंबरमध्ये सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. सदर माहिती मंगळवारी जारी करण्यात आलेल्या मासिकात देण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी हिवसाळ्याचा प्रत्यय राज्यातील नागरिकांना येणार असून पुन्हा एकदा पाऊस नको म्हणून सगळ्यांचा त्रागा पाहायला मिळणार आहे.

मंगळवारी पार पडलेल्या एका पत्रकार परिषदेत IMD, हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी याबाबत अधिक स्पष्टता दिली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील पाऊस अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून आर्द्रता आणणाऱ्या हवामान प्रणालीशी संबंधित आहे. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो. परिणामी, सामान्य दिवसाच्या तापमानापेक्षा थंड आणि रात्रीच्या तापमानापेक्षा जास्त उबदार होण्याची शक्यता आहे. ईशान्य मान्सूनच्या हवामान प्रणालीमुळे नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस पडू शकतो असे महापात्रा यांनी यावेळी सांगितले.

हे सुद्धा वाचा…

Tomato Prices : ‘टोमॅटो’ने शेतकऱ्यांना रडवलं; दर कमालीचे कोसळले

Nana Patole : ‘एकनाथ शिंदेंचं असंवेदनशील सरकार बरखास्त केलं पाहिजे’ शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना नाना पटोले आक्रमक

IND vs BAN : बांग्लादेश विरुद्धच्या सामन्यांत के एल राहुल संघाबाहेर! पाहा भारताची संभाव्य प्लेइंग 11

दरम्यान, कोणत्या जिल्ह्यांना याचा फटका बसणार याची सुद्धा माहिती हवामान खात्याकडून समोर आली आहे. खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार कोकण, गोवा आणि विदर्भाच्या काही भागात नोव्हेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो, यामुळे पावसामुळे ढगाळ वातावरण राहिल तर दिवसाचे तापमान थंड राहण्याची शक्यता वर्तवण्यात यावेळी वर्तवण्यात आली आहे. हवामान ढगाळ राहिल्याने परिणामी राज्यातील दिवसाचे तापमान थंड असण्याची सुद्धा शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

ढगाळ वातावरणामुळे दिवसा वातावरण थंड असले तरीही रात्री मात्र सामान्य तापमानापेक्षा वातावरण उष्ण राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पुण्यात सुद्धा दिवसा सामान्य तापमानापेक्षा वातावरण थंड राहिल आणि रात्री सामान्य तापमानापेक्षा काहीसे तापमान उष्ण राहिल असा सुद्धा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान या अवेळी पावसामुळे बळीराजाला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आधीच अतिवृष्टीमुळे पीक खराब झाल्याने बळीराजा हतबल झाला आहे परंतु आता नोव्हेंबर मध्ये थंडीत सुद्धा पाऊस पडणार असल्याने पुन्हा पीकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!