25 C
Mumbai
Thursday, September 7, 2023
घरमहाराष्ट्रदहीहंडीसोबत मुंबई, ठाण्यात पावसाचे आगमन!

दहीहंडीसोबत मुंबई, ठाण्यात पावसाचे आगमन!

दहीहंडी निमित्ताने गुरुवारी मुंबई, ठाणे परिसरात पावसाच्या जोरदार पुनरागमन झाले. घाटकोपर कांजूरमार्ग, विक्रोळी, कुर्ला, दादर, परळ, पवई, गोरेगाव आणि नरिमन पॉईंट परिसरात सकाळपासूनच पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्या. पावसाच्या संपूर्ण ऋतुमानात ऑगस्ट महिन्यापासून पाऊस पूर्णपणे गायब आहे. दहीहंडीच्या दिवशी गोविंदांना भिजवायला वरूण राजाने आवर्जून हजेरी लावल्याने सगळीकडे आनंदाचे वातावरण पसरले.

कोरोनाचा कठीण काळ सरल्यानंतर मुंबई, ठाणे परिसरात आता दहीहंडी जोमाने साजरी करायला सुरुवात झाली आहे. आठवड्याच्या शेवटापासूनच दोन वर्षानंतर गल्लीबोळ्यातील दहीहंडी सराव सुरू झाला. सप्टेंबर महिना सुरू झाला तरीही मुसळधार पावसाचा पत्ता नसल्याने राज्यात दुष्काळ सुरू झाला आहे.

राज्यातील विविध भागात पेरणी सुकल्याने मोठ्या आर्थिक संकटाची भीती व्यक्त होत असताना जन्माष्टमी पासून राज्यात ढगाळ वातावरण सुरू झाले. पश्चिम महाराष्ट्रात हलक्या पावसाला सुरुवात झाली. वेधशाळेने दहीहंडीच्या दिवशी मुंबई, ठाणे परिसरातही पावसाचा अंदाज केला होता. सकाळी अचानक मुसळधार जरीना सुरुवात झाली. गोविंद पथक दहीहंडीची सुरुवात करण्यापूर्वीच पावसाने जोर धरला. पावसाचा जोर लक्षात घेत अनेक गोविंदा पथकांनी हंडी फोडण्यासाठी काही काळ थांबण्याचा निर्णय घेतला.

हे सुद्धा वाचा 
जीआर घेऊन अर्जुन खोतकर यांनी घेतली जरांगेंची भेट, मात्र आंदोलन कायम
मला शाहरुखला भेटायचंही नव्हतं; गिरीजा ओक काय म्हणाली….
तुम्हाला माहिती आहे का, जन्माष्टमीनंतर दहिहंडी का साजरी केली जाते ?

दुपारी बाराच्या दरम्यान पावसाचा जोर ओसरला. त्यानंतर ढोल, बॅन्जोसह ठिकठिकाणी दहीहंडी फोडायला सुरुवात झाली. कोरोना काळातील गर्दीवर नियंत्रण आणण्याचे नियम शिथिल केल्याने दादर, लालबाग, ठाणे परिसरात दहीहंडी फोडण्यासाठी बघ्यांची गर्दी ओसंडून वाहत होती.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी