महाराष्ट्र

Mother Kills Daughter: पालघरमध्ये आईने स्वत:च्या मुलीला मारून कचरापेटीत पुरले

महाराष्ट्रातील (Maharashtra) पालघर (Palghar) जिल्हयात माणूसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका आईने कथितपणे स्वत:च्या तीन वर्षाच्या मुलीची हत्या करून तिच्या मृतदेहाला प्लास्टिक बॅगमध्ये भरून त्या बॅगला कचरापेटीत टाकले अशी माहिती तेथील स्थानिक पोलिसांनी दिली. पालघर जिल्हा ग्रामीण पोलिसांनी (Palghar Police) हया भयानक प्रकारानंतर अफसाना उर्फ तारा सुलेमानी (वय वर्षे 37) या महिलेला तिची मुलगी सना हीच्या हत्येच्या आरोपामध्ये अटक केली आहे अशी माहिती जवाहर पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी अप्पासाहेब लेंगरे यांनी दिली.

त्यांनी पुढे सांगितले की, आरोपी महिलेने तिच्या मुलीची हत्या केली. त्यानंतर ‍तिचा मृतदेह प्लास्टिकच्या बॅगमध्ये भरून ती वास्तव्यास असलेल्या घराजवळील बेकरीच्या कचरापेटीत फेकून दिला. त्यानंतर आरोपी महिलेने स्वतःचा गुन्हा लपविण्यासाठी तिची मुलगी हरवल्याचा खोटा आव आणला.

जेव्हा त्या महिलेच्या शेजाऱ्यांनी व नातेवाईकांनी त्या लहान मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना त्या चिमुरडीचा मृतदेह कचराकुंडीमध्ये आढळून आला. त्यानंतर शेजाऱ्यांनी व नातेवाईकांनी त्या महिलेला मारहाण केली अशी माहिती पोलिसांनी दिली.

हे सुद्धा वाचा –

India-Australia T-20 series: भारत आणि ऑस्ट्रेलिया आज एकमेकांशी मोहालीमध्ये भिडणार

Mobile Charger : मोबाईल चार्जर देखील करु शकतो तुमचे बँक खाते रिकामे

ED : पत्राचाळ बैठकीला ‘दोन’ माजी मंत्री हजर असल्याचा ईडीचा आरोप

स्थानिक पोलिसांना त्या प्रकरणाबाबत कळताच घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घडलेल्या गुन्हयाचा तपास करण्यास सुरूवात केली.‍

पोलिसांनी त्या लहान मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला तेव्हा त्यांना तिच्या शरीरावर जखमा आढळल्या. त्यामुळे पोलिसांनी तिच्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यांनी शेवटी असे नमूद केले की, या महिलेने आपल्या मुलीची हत्या का केली याचे कारण अदयाप कळू शकलेले नाही त्यामुळे पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहे.

अश्विन शेश्वरे

He writes about National and Maharashtra Politics, Education, Health, Civic, Legal, Crime and Sports beat for LayBhari News.

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

1 day ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

1 day ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

1 day ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

1 day ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

1 day ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

1 day ago