30 C
Mumbai
Wednesday, August 3, 2022
घरमहाराष्ट्रखासदार धैर्यशील मानेंच्या घराला आले छावणीचे स्वरूप

खासदार धैर्यशील मानेंच्या घराला आले छावणीचे स्वरूप

टीम लय भारी

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभेचे खासदार धैर्यशील माने ( MP Dhairyshil Mane) यांच्या कोल्हापूर येथील रुईकर कॉलनीमधील घरावर आज (दि. २५ जुलै २०२२) शिवसैनिकांकडून मोर्चा काढण्यात आला. धैर्यशील माने यांनी शिवसेना पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत गद्दारी केल्यामुळे कोल्हापुरातील शिवसैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. आणि त्याचमुळे शेकडो शिवसैनिकांनी धैर्यशील माने यांच्या घरावर धडक मोर्चा काढला.

यावेळी संतप्त शिवसैनिकांकडून धैर्यशील माने यांच्यावर तोफ डागण्यात आली. आपला गट अडगळीत पडला असताना उद्धव साहेबांनी आपल्याला लोकसभेत पाठवलं, प्रवक्ते पद दिलं. मातोश्रीवर जेव्हा जेव्हा गेला तेव्हा उद्धव साहेबांनी सन्मान दिला, ओ खासदार सांगा उद्धवसाहेबांचं काय चुकलं? हातकणंगले मतदारसंघातील शिवसैनिकांनी फुटक्या कवडीची अपेक्षा न करता स्वत:च्या घरातील भाकरी बांधून आपल्या विजयासाठी जीवाचं रान केलं, ओ खासदार सांगा शिवसैनिकांचे काय चुकलं? अशा प्रश्नांची धैर्यशील माने यांना शिवसैनिकांकडून विचारणा करण्यात आली आहे.

शिवसैनिकांनी धैर्यशील माने यांच्या घरावर मोर्चा काढल्याने पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली. यामुळे धैर्यशील माने यांच्या रुईकर कॉलनीमधील घराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. पोलिसांनी खासदार धैर्यशील माने यांच्या घराकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर चोख पोलीस बंदोबस्त लावला होता. त्याचबरोबर त्यांच्या घराकडे जाणारे सर्व मार्ग देखील पोलिसांकडून बंद करण्यात आले होते.

पोलिसांनी खासदार धैर्यशील माने यांच्या घराकडे जाणाऱ्या शिवसैनिकांच्या मोर्चाला छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळ अडवले पण यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी त्याच ठिकाणी ठिय्या आंदोलन करत धैर्यशील माने यांच्या घराकडे जाण्याची ठाम भूमिका घेतली. परंतु हा मोर्चा आणखी चिघळू नये, यासाठी पोलिसांनी शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, विजय देवणे आणि संजय पवार यांना ताब्यात घेतले.

या मोर्चामध्ये पुरुषांसह महिलांनी देखील मोठ्या संख्येने सहभाग दर्शविला होता. यावेळी खासदार धैर्यशील माने यांच्याविरोधात घोषणाबाजी देखील देण्यात आली. ‘गली गली शोर है, धैर्यशील माने चोर है’ अशा घोषणा शिवसैनिकांनी दिल्या. दरम्यान, कोल्हापुरात धैर्यशील माने यांच्याविरोधात शिवसैनिकांनी मोर्चा काढला असताना याचवेळी खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी शेतकऱ्यांना दिवसा वीज देणे, पूरपरिस्थिती आणि पंचगंगेतील प्रदूषण या मुद्द्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.

हे सुद्धा वाचा :

भांग, गांजा घेतल्यास बलात्कार, खून, दरोडे थांबतील, भाजप नेत्याचा अजब दावा

संजय मंडलिकांच्या निर्णयावर सतेज पाटलांनी व्यक्त केली नाराजी

संजय मंडलिकांनी कोल्हापुरातील शिवसैनिकांची फसवणूक केली : संजय पवार

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!