28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रआमदार मु्क्ता टिळक यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोंदींकडून शोक व्यक्त

आमदार मु्क्ता टिळक यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोंदींकडून शोक व्यक्त

पुण्यातील कसबापेठ विधानसभा मतदार संघाच्या भाजप आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचे गुरूवारी दुपारी निधन झाले. गेले अनेक दिवस त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. गॅलेक्सी केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर सर्वक्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देखील त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करुन शोकसंदेशात म्हटले आहे की, ‘मुक्ता टिळक जी यांनी समाजाची आत्मीयतेने सेवा केली. लोकोपयोगी मुद्दे उपस्थित करून त्यांनी आपला ठसा उमटवला आणि पुण्याच्या महापौर म्हणून त्यांची कारकीर्द लक्षणीय होती. भाजपाप्रती त्यांची कटिबध्दता कार्यकर्त्यांसाठी नेहमी संस्मरणीय राहील. त्यांच्या निधनाने दुःख झाले. त्यांचे कुटुंबीय आणि समर्थक यांच्याप्रती शोकसंवेदना व्यक्त करतो. ओम शांती”

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली अर्पण केली. ते शोकसंदेशात म्हणाले, लोकमान्य टिळकांचा वारसा लाभलेलं एक लढवय्ये नेतृत्व आपण आज गमावलं,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे. लोकमान्य टिळकांचा वारसा असला तरी आपल्या कामातून त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यामुळेच पुणे महापालिकेत सलग चार वेळा नगरसेविका नंतर पुण्याच्या महापौर आणि आमदार हा प्रवास त्या करू शकल्या. कर्करोगाशी झुंज देत असतांनाही राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावून आपल्या कर्तव्य भावनेचा परिचय त्यांनी दिला. कर्तव्यनिष्ठ, लढवय्ये नेतृत्व आपण गमावले आहे. आमदार मुक्ता टिळक यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
हे सुद्धा वाचा
चिकन टिक्का मसालाचा शोध लावणारे अहमद अस्लम अली यांचे निधन

पंतप्रधान मोदी यांचे नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन

हा कॉन्ट्रॅक्टर कोणाचा बगलबच्चा आहे?; अजित पवार संतापले

पुण्याच्या माजी महापौर आणि भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान आमदार मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने ध्येयनिष्ठ आणि समर्पित नेतृत्व हरपले आहे, अशा शोकसंवेदना व्यक्त करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या शोकसंदेशात म्हणतात, मुक्ताताई या भारतीय जनता पक्षाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या होत्या. सुमारे 30 वर्ष त्यांनी पक्षासाठी मोठे योगदान दिले. पुण्याच्या महापौर म्हणून त्यांनी शहरात विविध विकासकामांना चालना दिली होती. विधानसभा सदस्य म्हणून काम करताना त्यांनी आपल्या कर्तव्यांना प्राधान्य दिले. अलिकडेच झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत त्यांनी आजारपणातही मतदानात सहभाग नोंदवून लोकशाहीवरील आपली निष्ठा तसेच पक्षाचा उमेदवार जिंकलाच पाहिजे, यासाठी पक्षनिष्ठा दाखवून दिली होती. मी त्यांना या आजारपणात न येण्याची विनंती करून सुद्धा त्या दोन्ही निवडणुकीत रुग्णालयातून मतदानाला आल्या होत्या. पुण्यात विविध सामाजिक कामे करताना सर्वसामान्य जनता आणि विशेषतः महिलांच्या जीवनात बदल घडवून आणण्याला त्यांचे प्राधान्य होते. या कठीण प्रसंगात आम्ही सारेच त्यांच्या कुटुंबियांच्या सोबत आहोत. हे दुःख सहन करण्याची शक्ती कुटुंबियांना लाभो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मुक्ता टिळक यांच्यावर उद्या (दि. २३) सकाळी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेता येईल त्यानंतर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी