31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रभातसा विद्युत केंद्रात बिघाड झाल्याने मुंबई शहर आणि उपनगरात पाणी पुरवठ्यात १५...

भातसा विद्युत केंद्रात बिघाड झाल्याने मुंबई शहर आणि उपनगरात पाणी पुरवठ्यात १५ टक्के कपात

रवींद्र भोजने : टीम लय भारी

मुंबई महानगराला भातसा धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. भातसा विद्युत केंद्रांमध्ये बिघाड झाल्यामुळे या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाल्याने, मुंबई शहर आणि उपनगरातील पाणी पुरवठ्यामध्ये १५ टक्के कपात लागू करण्यात आली आहे.(Mumbai city and  15% reduction water supply)

मुंबई महानगरासाठी महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतील भातसा धरणातून दररोज सुमारे २ हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. दिनांक २७ फेब्रुवारी २०२२ रोजी भातसा येथील १५ मेगावॅट विद्युत केंद्रांमध्ये मोठी तांत्रिक समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे मुंबईला होणार्‍या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामध्ये जवळजवळ ४० टक्के कपात झाली आहे. हा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी काही कालावधी लागणार आहे.

 सध्या उपलब्ध होणार्‍या पाणीपुरवठ्यावर आणखी परिणाम होण्याची शक्यता आहे.  त्यामुळे सद्यस्थितीत मुंबई शहर आणि उपनगरात १५ टक्के पाणी कपात करण्यात आली आहे.  सर्व मुंबईकर नागरिकांनी याची नोंद घेऊन पाणी जपून वापरावे व बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

इंडिया बुल कंपनीकडून झोपडीधारकांचा पाणीपुरवठा बंद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई- बेलापूर वॉटर टॅक्सी आणि बेलापूर जेटी चे उद्घाटन

रावली-पवई-घाटकोपर पाणीपुरवठा बोगदा प्रकल्प पालिकेने पुन्हा सुरू केला

Salty hydrogel sucks liters of drinking water a day out of thin air

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी