29 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रMumbai News : मुंबई हायकोर्टाचे नाव आता महाराष्ट्र हायकोर्ट? वाचा काय म्हणाले...

Mumbai News : मुंबई हायकोर्टाचे नाव आता महाराष्ट्र हायकोर्ट? वाचा काय म्हणाले सुप्रीम कोर्ट

मुंबई उच्च न्यायालयाचे नाव बदलून महाराष्ट्र उच्च न्यायालय करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (3 नोव्हेंबर) फेटाळून लावली. मिळालेल्या माहितीनुसार, न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि न्यायमूर्ती विक्रम यांच्या खंडपीठासमोर याचिका फेटाळण्यात आली.

मुंबई उच्च न्यायालयाचे नाव बदलून महाराष्ट्र उच्च न्यायालय करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (3 नोव्हेंबर) फेटाळून लावली. मिळालेल्या माहितीनुसार, न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि न्यायमूर्ती विक्रम यांच्या खंडपीठासमोर याचिका फेटाळण्यात आली. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, या प्रकरणी संसदीय प्रक्रिया आहेत. त्यात न्यायालये हस्तक्षेप करू शकत नाहीत आणि जर असा बदल करायचा असेल तर तो संसदीय किंवा विधान मंडळाच्या माध्यमातून व्हायला हवा, त्यामुळे न्यायालय या प्रकरणात हस्तक्षेप करणार नाही. त्यामुळे न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. कारण नागरिकांच्या मुलभूत अधिकारांचे उल्लंघन होत असेल तर ते न्यायालयात तक्रार करू शकतात, असा कोणताही उल्लेख या प्रकरणात नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

Mumbai News : मुंबई पुन्हा हाय अलर्टवर; हाजी अली दर्ग्यावर दहशतवादी हल्ला करण्याचा कट

Maharashtra News : शिंदे सरकारच्या काळात निलंबित पोलीस अधिकाऱ्यांचे फावले; पुन्हा सेवेत रुजू

Mumbai News : सीताराम कुंटे अन् इक्बाल चहल यांना न्यायालयाचे समन्स; कोरोना लसीकरणात भेदभावाचा आरोप

‘मुंबई उच्च न्यायालयाचे महाराष्ट्र उच्च न्यायालय असे नामकरण करावे’
माहितीनुसार, महाराष्ट्र सरकारने 1960 मध्ये एक आदेश जारी केला होता, ज्यामध्ये स्पष्टपणे नमूद केले होते की ‘बॉम्बे हायकोर्ट’ यापुढे ‘महाराष्ट्र हायकोर्ट’ म्हणून ओळखले जाईल. परंतु या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही आणि बॉम्बे हायकोर्टाचे नाव तेच राहिले, 1995 मध्ये बॉम्बेचे नाव बदलून मुंबई करण्यात आले, त्यामुळे बॉम्बे हे शहर आता अस्तित्वात नाही, परंतु उच्च न्यायालय ‘बॉम्बे’ या नावाने आहे, 2016 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे नाव बदलून ‘महाराष्ट्र उच्च न्यायालय’ असे विधेयक संसदेत मांडण्यात आले. ते विधेयक मंजूर होऊ शकले नाही.

त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाचे नाव बदलून महाराष्ट्र उच्च न्यायालय करावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. दरम्यान, ‘बॉम्बे’चे नाव बदलून बॉम्बे करण्यात आले असले, तरी कोर्टाला बॉम्बे हायकोर्ट असेच संबोधले जाते. या संदर्भात काही नवीन हालचाल आहे का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी