27 C
Mumbai
Monday, March 18, 2024
Homeमहाराष्ट्रMumbai News : दिवाळीची मिठाई खरेदी करताना लागला 2.4 लाखांचा चुना! मुंबईतील...

Mumbai News : दिवाळीची मिठाई खरेदी करताना लागला 2.4 लाखांचा चुना! मुंबईतील घटना

दिवाळीसाठी मिठाई खरेदी करताना मुंबईतील एका 49 वर्षीय महिलेने ऑनलाइन फसवणुकीत 2.4 लाख रुपये गमावले. पोलिसांनी मंगळवारी (25 ऑक्टोबर) ही माहिती दिली.

दिवाळीत प्रत्येक घरात गोडाचे पदार्थ प्रामुख्याने मिठाई खाऊन सण गोडीने साजरा करण्याची परंपरा आहे. साधारणपणे यावेळी प्रत्येकजण मिठाईच्या दुकानात जाऊन आपल्या आवडीची मिठाई घेऊन येतो. मात्र, आजकालच्या आधुनिक जगात मिठाई सुद्धा ऑनलाईन ऑर्डर करण्याचे फ्याड सुरू झालं आहे. मात्र, अशा गोष्टी ऑनलाईन ऑर्डर करताना काळजी घेणे आवश्यक असते. अन्यथा तुमच्या सोबत फ्रॉड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असाच काहीसा प्रकार मुंबईत घडला आहे. दिवाळीसाठी मिठाई खरेदी करताना मुंबईतील एका 49 वर्षीय महिलेने ऑनलाइन फसवणुकीत 2.4 लाख रुपये गमावले. पोलिसांनी मंगळवारी (25 ऑक्टोबर) ही माहिती दिली.

या प्रकरणात मुंबईच्या उपनगरातील अंधेरी येथील रहिवासी असलेल्या पूजा शाहने रविवारी फूड डिलिव्हरी अ‍ॅपवर मिठाई ऑर्डर केली आणि ऑनलाइन 1,000 रुपये भरण्याचा प्रयत्न केला, परंतु पेमेंट अयशस्वी झाले. त्यानंतर जो प्रकार घडला त्याने या महिलेला तब्बल 2.4 लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले.

हे सुद्धा वाचा

Mumbai News : फोन रिपेअरिंगला दिला अन् बँकेतून 2 लाख गायब झाले! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

T20 World Cup : पाकिस्तानी संघ सेमी फायनलपूर्वीच करणार घरवापसी! भारताचा मार्ग मोकळा

SBI New Scheme : एकदा पैसै टाका अन् महिनाभर नफा कमवा! ‘एसबीआय’चा नवा प्लॅन माहितीये का?

OTP शेअर केल्यानंतर पैसे काढले
त्याने सांगितले, त्यानंतर महिलेने ऑनलाइन मिठाई दुकानाचा नंबर मिळवला. फोन उचलणाऱ्या व्यक्तीने त्यांना त्यांचा क्रेडिट कार्ड नंबर आणि फोनवर मिळालेला ओटीपी (वन टाइम पासवर्ड) शेअर करण्यास सांगितले. माहिती शेअर केल्यानंतर काही मिनिटांतच महिलेच्या खात्यातून सुमारे 2 लाख 40 हजार 310 रुपये काढण्यात आले.

अधिका-यांनी सांगितले की, ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांना 2 लाख 27 हजार 205 रुपये इतर खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यापासून रोखण्यात यश आले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

अन्नू कपूर केवायसी फसवणुकीचा बळी ठरला होता
अलीकडेच अभिनेता अन्नू कपूरसोबतही अशीच फसवणूक झाली होती, ज्यामध्ये त्याला एकूण 4.36 लाख रुपयांचे नुकसान झाले होते. सायबर क्राईमचा बळी ठरल्यानंतर अभिनेत्याने तत्काळ मुंबईच्या सायबर क्राईम सेलकडे तक्रार केली. एका व्यक्तीने अभिनेता अन्नू कपूरला बोलावले. यानंतर केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने त्या व्यक्तीने अभिनेत्याकडून काही वैयक्तिक माहिती घेतली.

यासाठी त्यांनी प्रथम अन्नू कपूर यांना त्यांच्या बँक खात्याचा तपशील जसे की बँक खाते क्रमांक आणि ओटीपी मागितला. अभिनेत्याने ही दोन्ही माहिती त्या व्यक्तीला कॉलवर शेअर केली होती. यानंतर अभिनेत्याच्या खात्यातून 4.36 रुपये कापण्यात आले. यासोबतच त्यांच्या आणखी दोन खात्यांमध्ये छेडछाड करण्यात आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी