30 C
Mumbai
Saturday, September 16, 2023
घरमहाराष्ट्रमविआ सरकारची कामगिरी भाजप सरकारपेक्षा चांगली; नाना पाटोलेंनी दाखवला प्रूफ

मविआ सरकारची कामगिरी भाजप सरकारपेक्षा चांगली; नाना पाटोलेंनी दाखवला प्रूफ

मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या रौप्यमहोत्सवी वर्षा निमित्त छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र सरकारची कॅबिनेट बैठक आज शनिवारी, (16 सप्टेंबर) पार पडली. मराठवाड्याच्या विकासासाठी यावेळी राज्य सरकारकडून वेगवेगळ्या योजनांची घोषणा करण्यात आली. यावरून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका केली. राज्यातील सरकार फक्त बोलघेवडे असून त्यांपेक्षा महाविकास आघाडी सरकार सर्वच बाबतीत सरस होते, असे व्यक्तव्य पटोले यांनी केले.

पटोले यांनी माहिती अधिकारातुन (RTI) मिळालेल्या माहितीचा दाखला देत, महाविकास आघाडी सरकार सध्याच्या शिंदे-फडवणीस-पवार सरकारपेक्षा कशाप्रकारे उत्तम काम करत होते हे सांगितले. “महाविकास आघाडी सरकारच्या 30 महिन्यांच्या काळात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरकारच्या काळात राज्यात 18 लाख 68 हजार 055 नवीन सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) स्थापन झाले. हे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारच्या पाच वर्षांच्या स्थापन झालेल्या 14 लाख 16 हजार 224 पेक्षा साडे चार लाखांच्या संख्येने जास्त आहेत. रोजगाराच्या आघाडीवरही मविआ सरकारच्या 30 महिन्यांच्या काळात 88 लाख 47 हजार 905 नोकऱ्या निर्माण झाल्या. हे प्रमाणही फडणवीस यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील नोकऱ्यांच्या तुलनेत जास्त आहे. मविआ सरकार पाडल्यानंतर नवीन उद्योगांची संख्या 8 लाख 94 हजार 674 वरून 7 लाख 34 हजार 956 वर घसरली आणि नवीन रोजगाराच्या संधी देखील 42 लाख 36 हजार 436 वरून 24 लाख 94 हजार 691 एवढी कमी झाली.”

“महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर आर्थिक प्रगतीचा वेगही वाढला होता. 71 लाख 01 हजार 067 रुपयांच्या एकूण गुंतवणुकीसह 7 लाख 04 हजार 171 व्यवसायांनी 30 लाख 26 हजार 406 नवीन नोकऱ्या (2019-2020) निर्माण केल्या. म्हणजेच पूर्ण पाच वर्षाचा कार्यकाळ सत्तेवर असणा-या फडणवीस सरकारपेक्षा महाविकास आघाडीच्या अवघ्या 30 महिन्यांच्या कार्यकाळात राज्यात 4 लाख 51 हजार 831 जास्तीचे सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) राज्यात सुरु झाले. त्यातून 26 लाख 11 हजार 027 नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या,” पटोले म्हणाले.

“माहिती अधिकारातून मिळालेल्या आकडेवारीनुसार जेव्हा कोरोना महामारी शिगेला पोहोचली होती तेव्हा राज्यात 6 लाख 21 हजार 296 नवीन उद्योगांची नोंदणी झाली होती ज्यामध्यमातून 44 लाख 60 हजार 149 रोजगार निर्मिती झाली.”

हे ही वाचा 

मराठवाड्यातील जनतेसाठी सरकारची ४५ हजार कोटींची मोठी गिफ्ट

मराठवाड्याला पाणी योजनेसाठी मिळणार 2784 कोटी! मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा..

परराज्यात ऊस निर्यातीला बंदी; राज्य सरकारने ऊचलले मोठे पाऊल

जगभरात कोरोनाचे संकट असताना महाविकास आघाडीचे सरकार राज्यात कार्यरत होते. मविआच्या अडीच वर्षांच्या काळातील दोन वर्षे कोरोंना काळाचा सामना करण्यात गेली.

याबाबत बोलत असताना पटोले म्हणाले, “मविआ सरकारच्या अडीच वर्षांच्या काळातील दोन वर्ष कोरोना महामारीच्या संकटाचा सामना करण्यात गेली. भाजपने या काळातच मविआचे सरकार पाडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणा, राज्यपाल कोश्यारी यांच्या मदतीने सरकारला अडचणीत आणण्याचे सातत्याने प्रयत्न केले. केंद्रातील मोदी सरकारनेही मविआ सरकारची विरोधी पक्षाचे सरकार म्हणून अडवणूक केली.”

“बोलघेवड्या शिंदे फडणवीस यांच्या अनैतिक व असंविधानिक सरकारपेक्षा महाविकास आघाडीचे सरकारने उत्तम कामगिरी केली हे स्पष्ट दिसत आहे”, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी