32 C
Mumbai
Wednesday, September 6, 2023
घरमहाराष्ट्रनाना पटोलेंनी वाजवली हलगी

नाना पटोलेंनी वाजवली हलगी

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या वर्षपूर्तीनिमित्त काँग्रेसने राज्यात जनसंवाद यात्रेला प्रारंभ केला आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी काँग्रेसन नेते राज्यभरात आंदोलन करत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चंद्रपूरजिल्ह्यात जनसंवाद यात्रा काढली असून आंदोलनादरम्यान त्यांनी हलगी वाजवून मोदी सरकारच्या विरोधात आवाज उठवला.

जनसंवाद यात्रेच्या तिसऱ्या दिवशी चंद्रपूर जिल्हा सेवादलाने आयोजित केलेल्या संस्कृतीक कार्यक्रमानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ध्वजारोहण केले. नाना पटोले म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप खोटे बोलून सत्तेत आले, सत्तेत आल्यानंतर या सरकारने घटनामत्क व्यवस्थेची मोडतोड केली. लोकशाही आणि संविधानाला धाब्यावर बसवूर मनमानीपणे कारभार हाकण्यास सुरुवात केली. साठ वर्षांच्या काळात काँग्रेसने ज्या संस्थांची उभारणी केली, त्या संस्था विकून हे सरकार देश चालवत असल्याचा घनाघात त्यांनी केला. मोदी सरकारच्या हूकुमशाहीतून देश आणि लोकशाही वाचविण्यासाठी काँग्रेसचीच नव्हे तर आपल्या सर्वांना ही लढाई लढावी लागेल असे देखील पटोले म्हणाले.

हे सुद्धा वाचा
१९ सप्टेंबरपासून नव्या संसद भवनात सुरू होणार कामकाज, निवडला गणेश चतुर्थीचा मुहूर्त
किरीट सोमय्या व्हिडीओ प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर काय म्हणाले कमलेश सुतार ?
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली! उपोषणाचा नववा दिवस..  

महागाई, शिक्षणचा प्रश्न यामुळे लोक चिंतेत आहेत. एकीकडे कच्च्या तेलाचे भाव कमी होऊन देखील सरकार पेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी करत नसल्याचे देखील ते म्हणाले. राज्य सरकारने वीज महाग केली असे सांगतानाच शेतीसाठी आठ तास देखील वीज उपलब्ध होत नसल्याचे पटोले यावेळी म्हणाले.

राज्यात कोणी कुठे काढली जनसंवाद यात्रा?

विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी सकाळच्या सत्रात अहमदनगर जिल्ह्यातील जनसंवाद यात्रा काढली त्यानंतर महाराष्ट्रातील जनसंवाद यात्रेच्या नियोजनाची बैठक घेतली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यवतमाळ जिल्ह्यात जनसंवाद यात्रेत सहभागी झाले. कोल्हापुरात विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज बंटी पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली भुदरगड तालुक्यात पदयात्रा काढण्यात आली. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे  शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या नेतृत्वात पर्वती विधानसभा मतदारसंघातून जनसंवाद पदयात्रेचा शुभारंभ  करण्यात आला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी