29 C
Mumbai
Saturday, March 18, 2023
घरमहाराष्ट्रएकनाथ शिंदेंच्या समोरच भर व्यासपीठावर न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी टोचले कान

एकनाथ शिंदेंच्या समोरच भर व्यासपीठावर न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी टोचले कान

वर्धा येथे आज 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे (96 Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणावेळी संमेलनाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर (Narendra Chapalgaonkar) यांनी शिंदे सरकारचे कान टोचले आहेत. विश्व साहित्य संमेलन घेणे हे काही सरकारचे काम नाही, असा टोला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. काही दिवसांपूर्वी मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांच्या पुढाकारातून मुंबईमध्ये सरकारच्यावतीने विश्व साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान या संमेलनाच्या आयोजनाबाबत चपळगावकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. संमेलन भरवणे हे शिंदे सरकारचे काम नाही असे ते म्हणाले.

काय म्हणाले चपळगावकर ?

यावेळी बोलताना चपळगावकर म्हणाले, जवाहरलाल नेहरु यांच्याबद्दल प्रभाकर पाध्ये यांनी एका लेखामध्ये लिहीले आहे. नेहरु साहित्यिकांना म्हणाले होते, आम्ही राजकारणी फार धांदलीत असतो घाईत असतो. आमच्या हातून पुष्कळ चुका होतात त्या आम्हाला कळत नाहीत. तेव्हा तुम्ही साहित्यिकांनी आम्हाला त्या चुका दाखवून दिल्या पाहिजेत. देशाचा पहिला पंतप्रधान अशा पद्धतीने साहित्यिकांवर अशी मोठी जबाबदारी टाकू इच्छीत होता. आज संध्याकाळच्या भाषणात मी विस्ताराने बोलणार आहेच. पण दोन गोष्टी यावेळी सांगू इच्छीतो एक अभिनंदनाची गोष्ट आहे. सीमाभागातील सांस्कृतिक संस्थांना महाराष्ट्र सरकारने मदत केली ही चांगली गोष्ट झाली, त्याबद्दल सरकारचे अभिनंदन. दुसरी गोष्ट जी आहे ती नेहरुंच्या सांगण्यावरुन मी करत आहे, परवा महाराष्ट्र राज्य सरकारने एक साहित्य संमेलन घेतले. मी आपल्याला नम्रपणे पण गंभीरपूर्वक सांगू इच्छीतो की, सरकारचे साहित्य संमेलन घेणे हे काम नाही. सरकारी संमेलन ही निसरड्याची जागा असते. तिथून आपण किती खोल गर्तेत जावू हे सांगता येत नाही. सरकारी संमेलनाचे रुपांतर सरकारी साहित्यात होऊ शकते, म्हणून आपण शक्यतो स्वायत्त साहित्य संस्थांच्यातर्फेच असे कार्यक्रम केले पाहिजेत. साहित्य संस्थांनी सुद्धा आपली स्वायत्तता जपण्यासाठी जी पथ्ये पाळणे आवश्यक आहे ती पाळावीत तरच त्यांची प्रतिष्ठा समाजात आणि साहित्याच्या जीवनात वाढेल.

 हे सुद्धा वाचा

मुंबई शिर्डी प्रवास होणार वेगवान अन् आरामदायी; राज्यात दोन नव्या वंदे भारत एक्सप्रेस

मोदींनी अतिश्रीमंत लोकांना सूट दिली, 5 ट्रिलियन इकॉनॉमीची घोषणा हवेत विरली!

आंगणेवाडीला येणाऱ्या भाविकांना यात्रेचे फोटो, व्हिडीओ काढण्याचा आनंद लुटता येणार

वेगळ्या विदर्भाच्या मागणीवरुन गोंधळ

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असताना काही कार्यकर्त्यांनी वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी, तसेच शेतकऱ्यांच्या मुद्यावर जोरदार घोषणाबाजी करत संमेलनस्थळी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. भाषणादरम्यान मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सामान्यांचे म्हणणे ऐकून घेऊ, मात्र हे साहित्याचे व्यासपीठ असल्याने येथे गोंधळ न घालण्याचे त्यांनी आवाहन केले.

 

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी