30 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रनरेंद्र मोदींच्या दुसऱ्या कारकिर्दीचा आढावा घेणाऱ्या श्रीराम पवार लिखीत तीन पुस्तकांचे उद्या...

नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या कारकिर्दीचा आढावा घेणाऱ्या श्रीराम पवार लिखीत तीन पुस्तकांचे उद्या प्रकाशन

मोदींच्या नेतृत्त्वात भाजप 2014 साली केंद्रात सत्तेत आली, त्यानंतर देशात मोदीयुग सुरु झाले. त्याच वेगात मोदींची दुसऱ्या कारकिर्दीसह पंतप्रधानपदाची नऊ वर्षे होत आहेत. त्यानिमित्त देशभरात मोदींच्या नऊ वर्षांच्या कार्याचा लेखाजोखा मांडला जात आहे. मोदींच्या दुसऱ्या कारकिर्दीचा आढावा घेणारी तीन पुस्तके ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक श्रीराम पवार यांनी लिहीली असून या तीनही पुस्तकांचे प्रकाशन बुधवारी (दि.३१) रोजी होणार आहे.

सकाळ माध्यम समूहाचे संपादक, संचालक व राजकीय विश्लेषक श्रीराम पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या दुसऱ्या कारकिर्दीचा आढावा घेणारी ‘मोदी 2.0 अमुलाग्र राजकीय बदलाची नांदी’, ‘मोदी 2.0 राजकीय शक्यतांच्या शोधात’ आणि मोदी 2.0 वैचारिक स्वप्नपूर्तीची दिशा ही तीन पूस्तके लिहीली असून सकाळ प्रकाशनातर्फे ही पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत.

हे सुद्धा वाचा

निळू फुले यांच्या कन्येचा राष्ट्रवादीत प्रवेश, आता मुख्य प्रवाहात करणार काम

अहिल्यादेवी होळकर यांचा खोटा कळवळा आणणारे पडळकर गप्प का, प्रशांत विरकर यांचा सवाल

सावित्रीबाई फुलेंबद्दल विकृत लिखाण, छगन भुजबळ संतापले !  

श्रीराम पवार लिखीत या तीनही पुस्तकांचे प्रकाशन उद्या होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ राजकीय विचारवंत, विश्लेषक प्रा. डॉ. गोपाळ गुरु, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दिक्षित आणि उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील अॅड. अभय नेवगी उपस्थीत राहणार आहेत. पुस्तक प्रकाशनाचा हा कार्यक्रम पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माधवराव पटवर्धन सभागृह, टिळक रोड येथे संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला ठेवण्यात आलेला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी