29 C
Mumbai
Thursday, September 14, 2023
घरमहाराष्ट्रनियतीचा खेळ! जीपला भरधाव कंटेनरची धडक, शाळकरी मुलांच्या मृत्यूनं काळीज पिळवटलं...

नियतीचा खेळ! जीपला भरधाव कंटेनरची धडक, शाळकरी मुलांच्या मृत्यूनं काळीज पिळवटलं…

राज्यात अपघातांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. नुकतीच एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. यात सहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही दुर्दैवी घटना नाशिक- भिवंडी महामार्गावर घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक- भिवंडी महामार्गावर कंटनेर आणि प्रवाशी जीपची समोरासमोर रस्ता क्रॉस करत असताना जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की त्यात सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महाविद्यालयीन आणि शाळकरी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आज सकाळी साडेसहाच्या सुमारास मौजे पडघा खडवली फाट्याजवळ कंटेनर MH48T7532 आणि काळी पिवळी जीप MH04E1771 विद्यार्थी असलेली पडघावरून खडावली रेल्वे स्टेशनला जात असताना भीषण अपघात झाला. यात चिन्मयी विकास शिंदे (15), रिया किशोर परदेशी, चैताली सुशांत पिंपळे (27), संतोष अनंत जाधव (50), वसंत धर्मा जाधव (50), प्रज्वल शंकर फिरके यांचा मृत्यू झाला आहे. तर दिलीप कुमार विश्वकर्मा (29), चेतना गणेश जसे (19), कुणाल ज्ञानेश्वर भामरे (22) ही जखमींची नावे आहेत. दरम्यान भिवंडीतील मायरा हॉस्पिटलमध्ये जखमींवर उपचार सुरू आहेत.

हे सुद्धा वाचा:

पुढील 3 ते 4 दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे! पावसाबाबत वाचा हवामान खात्याचा नवीन अपडेट

मेल ट्रेनचे इंजिन फेल झाल्याने कसाराकडून मुंबईला येणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, लोकल सेवा उशिराने

भूमाफियांनी शेकडो हेक्टर कांदळवन तो़डल्यावर ठाणे जिल्हा प्रशासनाला जाग; कांदळवनासाठी टोल फ्री क्रमांक

मयत झालेल्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मोलाचे कार्य केले. दरम्यान मुंबई- नाशिक महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. तसेच याआधी ही खडवली फाट्याजवळ अनेक अपघात झालेले आहेत. हे लक्षात घेता प्रशासनाने यावर लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी