28 C
Mumbai
Friday, September 2, 2022
घरमहाराष्ट्रNashik Central Jail Attack : कैद्यांचा जीवघेणा हल्ला, पोलिसाचे फोडले डोके

Nashik Central Jail Attack : कैद्यांचा जीवघेणा हल्ला, पोलिसाचे फोडले डोके

या जीवघेण्या हल्ल्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या धक्कादायक घटनेनंतर पोलिस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेत हलगर्जीपणा करण्यात येत असल्याचे सुद्धा समोर आले आहे. या घटनेत जखमी झालेले पाटील यांना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून याप्रकरणी आणखी तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कारागृहातील कैद्यांनी जीवघेणा हल्ला चढवून पोलिस कर्मचाऱ्याला जखमी केले आहे. प्रभू चरण पाटील असे पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली आहे. बॅरेक का चेंज केलं, असा प्रश्न या कर्मचाऱ्याने तेथील काही कैद्यांना विचारला होता, मात्र यावर राग व्यक्त करीत कैद्यांनी पाटील यांना मारहाण केली. या सगळ्याच आरोपींवर याआधी खुनाच्या गुन्ह्याचा आरोप आहे. साधारण दहा ते बारा कैद्यांनी हा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. जखमी झालेले प्रभू पाटील यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या येरवडा कारागृहातून नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात काही कैदी दाखल झाले. या कैद्यांना बॅरेक का चेंज केलं असे विचारताच पोलिस कर्मचारी प्रभू चरण पाटील यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीत पाटील यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाली असून यात ते गंभीर जखमी झाले आहेत. 10 – 12 कैद्यांनी पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचे समोर आले असून सगळ्यांवर याआधी खूनाचा गुन्हा दाखल झालेला आहे.

Vinod Kambali : माजी स्टार क्रिकेटर विनोद कांबळी कामाच्या शोधात

Nitin Gadkari : भाजपकडून नितीन गडकरींना दुजाभाव?

Azadi ka Amrit Mahotsav:’आजादी का अमृत महोत्सव’ : पतंगबाजीमुळे शेकडो पक्षी घायाळ

या जीवघेण्या हल्ल्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या धक्कादायक घटनेनंतर पोलिस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेत हलगर्जीपणा करण्यात येत असल्याचे सुद्धा समोर आले आहे. या घटनेत जखमी झालेले पाटील यांना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून याप्रकरणी आणखी तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी