31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यातील 'या' भागात भीषण जलसंकट, दुषित पाणी देतयं आजारांना आमंत्रण

राज्यातील ‘या’ भागात भीषण जलसंकट, दुषित पाणी देतयं आजारांना आमंत्रण

मे महिन्यात सर्वत्रच पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. दरम्यान राज्यातील नाशिकमध्ये एका गावात पाणीसंकट निर्माण झाले आहे. हत्तीपाडा गावात सध्या सुरू असलेल्या जलसंकटामुळे लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. एका स्थानिक महिलेने सांगितले की, आमच्या गावातील विहिरीत खूप घाण पाणी आहे. तसेच पाणी खूप खाली गेले आहे. महिलांना पाणी मिळण्यात खूप अडचणी येत आहेत. हे घाण पाणी पिऊन मुलेही आजारी पडत आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भागात जलसंकट आले आहेत. दरम्यान नाशिक जिल्ह्यात अनेक गावातील लोक जीव धोक्यात घालून विहिरींचे पाणी काढत आहे. या भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. काही ठिकाणी गावकरी पाण्यासाठी ७० फूट विहिरीत उतरत आहेत. तर काही भागात कमालीची तापमानाची स्थिती आणि भूजलाचा सतत होणारा ऱ्हास यामुळे लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

नाशकात गंगोडबारी येथील लोक पाण्यासाठी रोज जीव धोक्यात घालतात. ग्रामस्थांनी सांगितले की, गावात पाणीटंचाई जाणवण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या १० वर्षांपासून ही समस्या उद्भवली आहे. नाशिकच्या गंगोडबारी गावातील लोक पाण्यासाठी ७० फूट विहिरीत उतरतात. तर दुसरीकडे आजूबाजूच्या इतर गावातील महिला विहिरीतून पाणी आणण्यासाठी २ किमी पायपीट करत आहेत. गावातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे रहिवाशांना पाण्यासाठी डोंगराखालील ठिकाणी जावे लागत असल्याचे स्थानिक लोकांचे सांगितले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी