30 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रNashik News : दुःखद! वाईट स्वप्न पडतात म्हणून संपवलं जीवन; नाशकातील वेदनादायक...

Nashik News : दुःखद! वाईट स्वप्न पडतात म्हणून संपवलं जीवन; नाशकातील वेदनादायक घटना

नाशिकमधील एका युवकाने थेट स्वप्नांना कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. नाशिक मधील अंबड पोलीस ठाण्यात या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आत्महत्या हा शब्द काही आपल्यासाठी नवीन राहीलेला नाही, एखाद्याने स्वताला होणाऱ्या त्रासाला किंवा आयुषाला कंटाळून आत्महत्या केली ,अशा अनेक घटना आपन रोज ऐकतच असतो. अशीच एक घटना नशिकमध्ये घडलेय. नाशिकमधील एका युवकाने थेट स्वप्नांना कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. नाशिक मधील अंबड पोलीस ठाण्यात या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जगात वाढत्या स्पर्धेमुळे शारीरिक तान या सोबतच मानसिक तान या मधे सुद्धा वाढ होत चालली आहे, अनेक लोक या मानसिक तानामुळे आत्महत्ये सारख अगदी टोकाचे पाऊल उचलताना विचार सुद्धा करत नाही. असचं काही नाशिकच्या या तरुणा सोबत घडली आहे. या तरुणाला वारंवार वाईट स्वप्न पडत असल्याने याने कंटाळून स्वतःलाचं संपविले आहे. नाशिक मधील अंबड परिसरातील दत्तनगर या भागात ही घटना घडली आहे. युवकाने स्वतःवर पेट्रोल टाकून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाली आहे.

विशाल विश्वास कडवे बावीस वर्षाचा हा तरुण मूळचा धुळे येथील असुन ,नाशिकमध्ये कामधंद्यासाठी आला होता. एमआयडीसीत कामाला असलेला विशाल अंबडमध्ये भाड्याच्या खोलीत राहत होता. मात्र त्याला पडणाऱ्या वाईट स्वप्नांमुळे तो त्रासला होता.विशालचे वडील विश्वास कडवे यांनी दिलेल्या माहीती नुसार स्वप्नात एक मुलगी त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जाळत असल्याचे स्वप्न त्याला दररोज रात्री पडत असायचे. आणि याचं स्वप्नांना कंटाळून त्याने अंबड येथील राहत्या घरासमोर स्वतःला पेटवून त्याने आत्महत्या केली.

हे सुद्धा वाचा

Maharashtra Politics : ‘…नाहीतर राज्यातला ऑक्सिजन गुजरातला गेला असता’

Bachhu Kadu : ‘सत्ता गेली चुलीत, आम्हांला त्याची पर्वा नाही!’ बच्चू कडू आक्रमक

Rambha Car Accident : सलमान खानच्या अभिनेत्रीचा भीषण कार अपघात

घटना घटत असताना अनेकांनी पाहीले परंतु परिसरातील लोकांनी भीतीपोटी मदत करण्याचे टाळले.यात युवकाचा अंत झाला. तरुणाने केलेल्या या प्रकरणा नंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे . अंबड पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी लगेचं घटनास्थळी धाव घेतली. यानंतर युवकाच्या नातेवाईकांना घटनेची माहिती कळविण्यात आली. त्यानंतर युवकाचे वडील विश्वास कडवे यांनी नाशिकला येउन पुढील कार्यवाहीसाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात युवकाला दाखल केले. त्यानंतर अंबड पोलिसांकडे मृत्यूची नोंद करण्यात आली.

घटनेवर काय म्हणाले अंबड पोलिस ?
घडलेल्या घटनेवर बोलताना अंबड पोलिस तरुनानी केलेली आत्महत्या ही त्याला पडणाऱ्या स्वप्नांमुळेचं केली आहे अस स्पष्ट केल आहे. स्वप्नात एक मुलगी त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जाळत असल्याचे स्वप्न त्याला दररोज रात्री पडत असायचे अस ही त्यांनी सागितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी